प्लास्टिकच्या अतिवापरामुळे आज पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय हवा, जमीन आणि पाणी दूषित होण्याबरोबरच प्लास्टिक प्रदूषण (Campaign Godavari Brahmagiri Plastic Free) ही आता दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली समस्या आहे. त्यामुळे प्लास्टिक प्रदूषण दूर करण्यासाठी ‘नमामि गोदा फाउंडेशन’ आणि सत्संग फाउंडेशन यांच्यातर्फे गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 2 ऑक्टोबरपासून अभियान राबवण्यात येणार आहे.
यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नमामि गोदा फाउंडेशन अध्यक्ष राजेश पंडित म्हणाले, की २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियानांतर्गत सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत ‘प्लास्टिकमुक्त नाशिक, कचरामुक्त गोदावरी’ चळवळ सुरू होईल. दुपारी ४ ते ६ या वेळेत त्र्यंबकरोडवरील इस्पॅलिअर शाळा येथे ‘माय ट्री’ संकल्पनेचा शुभारंभ होईल. सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत ‘अध्यात्म आणि सेवा’ या विषयावर श्री. एम हे शंकराचार्य न्यास, कुर्तकोटी सभागृह येथे मार्गदर्शन करतील. दि. ३ रोजी सकाळी ७.३० ते सकाळी १० या वेळेत ब्रह्मगिरी पर्वतावर वृक्षारोपण, गवतरोपण, प्राचीन कुंडांचे पुनरुज्जीवन, ‘प्लास्टिकमुक्त ब्रह्मगिरी चळवळ’ प्रारंभ आदी उपक्रम राबविण्यात येतील. नाशिककरांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नमामि गोदा फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Tuljabhavani Online pooja : तुळजाभवानीदेवीची ‘सिंहासन पूजा’ ऑनलाईन करता येणार, मंदिर प्रशासनाकडून आवाहन)
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत नमामि गोदा फाउंडेशन अध्यक्ष राजेश पंडित, अभिनेते चिन्मय उद्गगीरकर यांनी माहिती दिली. त्यांच्यासोबत फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि भाजपचे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, डॉ. वृषिनित सौदागर उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत २ आणि ३ ऑक्टोबर रोजी गोदाकाठ आणि ब्रह्मगिरी (त्र्यंबकेश्वर) येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे क्रियायोग गुरू श्री. एम आणि प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह उपस्थित राहणार आहेत.
Join Our WhatsApp Community