आमदार अपात्रतेचा (MLAs Disqualification) मुद्दा चर्चेत असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी थेट दिल्ली गाठली. तेथे कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून रात्रीच ते पुन्हा मुंबईत परतले. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की गरज लागली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही बोलावुन घेऊ त्यामुळे या सुनावणी दरम्यान नक्की काय होईल याबाबतच्या चर्चा होत आहेत.
यावेळी’ पुढे बोलताना नार्वेकर म्हणाले की , दिल्लीत माझा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. अनेकांच्या भेटीगाठी घ्यायच्या होत्या. त्यातील काही भेटी या कायदेतज्ज्ञांशी होत्या. आमदार अपात्रतेसंदर्भात जो कायदा आहे त्याच्यात बदल होत राहतात. परिस्थितीनुसार वेगवेगळे बदल होत असतात. एकूणच सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली आहे त्यावर जे निर्देश देण्यात आले आहेत किंवा या कायद्यात अजून काही संशोधन करण्याची गरज आहे किंवा त्याची योग्य अंमलबजावणी कशी करता येईल, यासंदर्भातील अनेक तज्ज्ञांशी माझी चर्चा झाली’ असे नार्वेकर म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर आमदार अपात्रतेच्या याचिकांवरून हालचाली वाढल्या असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महाधिवक्ता तुषार मेहता यांच्यासह इतर कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यानंतर अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेची प्रक्रिया सुरू केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पुढील आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. तशीही आमची सुनावणी १४ तारखेला झाली होती आणि ती नियोजित सुनावणी होती. त्यामुळे येत्या आठवड्यात निश्चित सुनावणी घेऊन निर्णय घेऊ आमदार अपात्रतेच्या बाबतीत मी सुनावणी घेऊन निर्णय देणार असल्याने अधिक बोलणे उचित ठरणार नाही. ही बाबी न्यायप्रविष्ट आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community