Suspended Deputy Superintendent : दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पोलीस उपअधीक्षकाला अटक

४० वेळा फोनद्वारे केलेले संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले

139
Suspended Deputy Superintendent : दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पोलीस उपअधीक्षकाला अटक
Suspended Deputy Superintendent : दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पोलीस उपअधीक्षकाला अटक

दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाखाली जम्मू-काश्मीर पोलिसांनी गुरुवारी एका पोलीस उपअधीक्षकाला अटक केली आहे. शेख आदिल मुश्ताक असे या उपअधीक्षकाचे नाव आहे. (Suspended Deputy Superintendent)

दहशतवादी कारवायांमध्ये सामील आरोपी मुजाहिल जहूर याच्याकडून ५ लाख रुपयांची लाच घेतली असल्याचा तसेच एका पोलीस अधिकाऱ्याला अडकवल्याचा आरोप शेख आदिलवर आहे. पोलीस उपअधीक्षक शेख आदिल हा मुजाहिल जहूर याच्या सातत्याने संपर्कात होता. जहूरला टेरर फंडिंग प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी आदिल सातत्याने प्रयत्न करत होता, अशी माहिती उघड झाली आहे.

(हेही वाचा – Female Cricket Umpire : इंग्लंडच्या स्यू रेडफर्न प्रथमश्रेणी क्रिकेटमधील पहिल्या महिला पंच)

आदिल आणि मुजाहिल यांच्यातील टेलिग्राम अॅपवरील चॅट आणि जवळपास ४० वेळा फोनद्वारे केलेले संभाषणाचे रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागल्यामुळे पोलिसांनी शेख आदिल मुश्ताकला रंगेहात अटक केली. श्रीनगर येथील नौगाम पोलीस ठाण्याचा निलंबित पोलीस उपअधीक्षक शेख आदिल याच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात खोटे पुरावे देणे, आधीचे पुरावे नष्ट करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.