Mumbai Airport : धावपट्ट्यांच्या दुरुस्तीकरिता मुंबई विमानतळ १७ ऑक्टोबरला बंद, विमानतळ प्रशासनाचा निर्णय

सकाळी ११ ते ५ दरम्यान ही दुरुस्ती केली जाणार आहे

124
Mumbai Airport : धावपट्ट्यांच्या दुरुस्तीकरिता मुंबई विमानतळ १७ ऑक्टोबरला बंद, विमानतळ प्रशासनाचा निर्णय
Mumbai Airport : धावपट्ट्यांच्या दुरुस्तीकरिता मुंबई विमानतळ १७ ऑक्टोबरला बंद, विमानतळ प्रशासनाचा निर्णय

पावसाळ्यानंतर नियोजित देखभाल दुरुस्तीकरिता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai Airport ) दोन्ही धावपट्ट्या १७ ऑक्टोबर २०२३ रोजी बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. यावेळी सकाळी ११ ते ५ दरम्यान ही दुरुस्ती केली जाणार असल्यामुळे धावपट्ट्या बंद राहतील.

(हेही वाचा  – ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाची बक्षिसाची रक्कम जाहीर, विजेत्याला मिळणार ‘इतके’ कोटी)

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज ९०० हून जास्त विमानांची उड्डाणे होत अ असतात. त्यामुळे पावसाळ्यानंतर अनेक प्रकारची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे असते. मुसळधार पावसामुळे धावपट्टीची क्षमता कमी होते. धावपट्टीवर अनेक ठिकाणी खड्डे पडतात, याचा त्रास विमानांना होऊ शकतो. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याकरिता RWY 09/27 आणि RWY 14/32 या धावपट्ट्या दुरुस्त करण्यासाठी सहा तास दोन्ही धावपट्ट््या तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भात सहा महिने आधी नोटीस टू एअरमेन (NOTAM) देखील जारी करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.