ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे सेंच्युरी कंपनीतील CS2 डिपार्टमेंटमध्ये मोठा स्फोट (Ulhasnagar Blast) झाल्याची घटना शनिवारी (२३ सप्टेंबर) घडली . या अपघातात अनेक कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच चार ते पाच जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उल्हासनगरच्या शहाड जवळील सेंचुरी रेयॉन कंपनीत हा भीषण स्फोट झाला आहे. कंपनी प्रशासनाकडून किंवा पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती यासंदर्भात दिली जात नाही आहे.विशेष म्हणजे कंपनीला बॅरीगेटिंग केली असून प्रसार माध्यमांना आतमध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
मात्र हा ब्लास्ट इतका भीषण होता की आजूबाजूच्या चार ते पाच परिसरातील घरांना हादरे बसल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे.दरम्यान सेंचुर रेयॉन ही नामांकित कंपनी असून या कंपनीमध्ये जो स्फोट झाला तो कशामुळे झाला याची अजून स्पष्टता झालेली नाही.सध्या पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाला असून या स्फोटाचा तपास सुरु आहे.
(हेही वाचा : ICC ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषकाची बक्षिसाची रक्कम जाहीर, विजेत्याला मिळणार ‘इतके’ कोटी)
Join Our WhatsApp Community