PM Narendra Modi : काशीमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमचा फायदा पूर्वांचलला होणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

99

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी, २३ सप्टेंबर रोजी आपल्या लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. त्यावेळी माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री आदी माजी खेळाडूही उपस्थित होते. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनीही सहभाग घेतला. लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज पुन्हा एकदा मला वाराणसीत येण्याची संधी मिळाली आहे.

लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, आज काशीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी झाली आहे. हे स्टेडियम वाराणसी आणि पूर्वांचलच्या तरुणांसाठी वरदान ठरणार आहे. हे स्टेडियम तयार झाल्यावर एकाच वेळी ३० हजारांहून अधिक लोकांना येथे सामना पाहता येणार आहे. जेव्हापासून स्टेडियमचा आरखडा समोर आला आहे, तेव्हापासून प्रत्येक काशीवासी चक्रावून गेला आहे. महादेवाच्या नगरीत तयार होत असलेल्या स्टेडियमची रचना महादेवालाच समर्पित आहे.

(हेही वाचा Hardeep Singh Nijjar : अमेरिकेने जसे दुसऱ्या देशात घुसून मारले, तसे भारताने निज्जरला मारले तर चूक काय ?; पेंटागॉनच्या अधिकाऱ्याचा अमेरिका प्रशासनाला आरसा)

असे असेल स्टेडियम 

मुख्यमंत्री योगी यांच्या भाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बटण दाबले आणि पूर्वांचलच्या पहिल्या आणि यूपीच्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून स्टेडियमचे स्पष्टीकरण देण्यात आले. या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भगवान शिव आणि काशीची झलक पाहायला मिळणार आहे. स्टेडियमचा आकार चंद्रकोराच्या आकाराचा असेल, ज्यामध्ये फ्लड लाइट बसवलेले असतील ते त्रिशूलाच्या आकारात असतील. बसण्याची व्यवस्था बेल पत्राच्या आकाराची असेल. डिसेंबर २०२५ पर्यंत हे स्टेडियम तयार होईल. कानपूर आणि लखनौनंतर हे यूपीचे तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. स्टेडियमच्या जागेसाठी उत्तर प्रदेश सरकारने 121 कोटी रुपये खर्च केले आहेत. बीसीसीआय स्टेडियमच्या बांधकामासाठी एकूण 330 कोटी रुपये खर्च करणार आहे. या स्टेडियमच्या माध्यमातून वाराणसीमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम बनवले जाणार आहे. वाराणसीतील राजतलाबच्या गंजरीमध्ये हे स्टेडियम बांधले जाणार आहे. ते बांधण्यासाठी एकूण 450 कोटी रुपये खर्च येणार आहेत. हे स्टेडियम 30 एकरपेक्षा जास्त परिसरात पसरले आहे.

माझ्या काशीला फायदा होईल – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, येथे अनेक महान क्रिकेट सामने होतील. स्थानिक खेळाडूंना स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. याचा माझ्या काशीला खूप फायदा होईल. आज क्रिकेटच्या माध्यमातून जग जोडले जात आहे. साहजिकच आगामी काळात क्रिकेट सामन्यांची संख्याही वाढणार आहे. वाराणसीचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम ही मागणी पूर्ण करेल. हे स्टेडियम पूर्वांचलचा चमकता तारा बनणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.