दीड आणि पाच दिवसांचे घरगुती गणपतींचे मोठ्या संख्येने विसर्जन होते. मात्र जास्तीतजास्त सार्वजनिक गणपती हे दहा दिवसांचे असतात. त्यामुळे अनेक नागरिक हे सार्वजनिक गणपतींचे देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रविवारचा मेगाब्लॉक (MegaBlock ) रद्द करून प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. मात्र लोकलसेवा रविवार वेळापत्रकाप्रमाणे चालणार असल्याने तर काही लोकल रद्द असणार आहेत.
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण कसारा कर्जत, हार्बर-ट्रान्सहार्बरसह बेलापूर-खारकोपर मार्गिकांवरील रविवारी घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेने शनिवारी रात्रकालीन बोरिवली ते भाईंदरदरम्यान ब्लॉक घोषित केला आहे. यामुळे रविवारी दिवसा मुंबई लोकलच्या कोणत्याही मार्गावर ब्लॉक असणार नाही. सोमवार ते शुक्रवार मध्य रेल्वेवर १ हजार ८१० लोकल फेऱ्या होतात. रविवारी सुट्टी असल्याने तीनशेहून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतात. यामुळे रविवारी १ हजार ४७४ फेऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार आहेत.
(हेही वाचा : Nagpur Flood : पावसाचा कहर १४० जणांसह ४० मुकबधीर मुलांचीही सुटका)
Join Our WhatsApp Community