प्रज्ञान रोव्हर, विक्रम लँडर स्लिपमोड मध्येच; ISROचे प्रयत्न सुरूच 

146

chandrayaan 3 च्या अंतर्गत सध्या ISRO चे चंद्रावर स्लिपमोडवर असलेल्या प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर यांना सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरु आहे. गुरुवार, २१ सप्टेंबर रोजी चंद्रावर दक्षिण ध्रुवावर उजेड आला आहे, तरीही ISROचे सिग्नल प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला मिळत नाही, असे ISROने म्हटले आहे.

हेही पहा –

देशातील जनता पुन्हा एकदा चांद्रयान-३ कडे डोळे लावून बसली आहे. २१ सप्टेंबरला चंद्रावर सकाळ झाली आणि सूर्यकिरणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचली. त्यामुळे सगळेच जण २२ सप्टेंबरची वाट पाहत होते. इस्रोने प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. पण इस्रोच्या सिग्नलला चांद्रयान-३ कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी  ISROने विक्रम आणि प्रज्ञानशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. पण ते अपयशी ठरले. आजही इस्रोकडून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ISROने २३ ऑगस्टला चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरला दक्षिण ध्रुवावर उतरवले. यानंतर ११ दिवस प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभूमीची, जमिनीखाली असलेल्या खनिजांची, भूकंपाशी संबंधित घडामोडींची माहिती इस्रोला पाठवली.

प्रज्ञान आणि विक्रमशी संपर्क होण्याची शक्यता ५०-५० टक्के आहे. संपर्क होऊ न शकल्यास नुकसान होणार नाही. मिशन आधीच पूर्ण झाले आहे. विक्रम आणि प्रज्ञान यांनी त्यांची कामगिरी आधीच पार पाडली आहे. लँडर आणि रोव्हरशी संपर्क झाल्यास चंद्राच्या पृष्ठभागावर आणखी प्रयोग करता येतील, असे  ISROने म्हटले आहे.

(हेही वाचा Khalistani : एनआयएने पन्नूच्या अमृतसर, चंदीगडमधील मालमत्ता केली जप्त )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.