श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर शनिवारी पाच दिवसांच्या बाप्पांना पावसात नाचत आणि जयघोष करत भक्त मंडळी निरोप देत आहेत. (Ganesh Festival) यंदा गौरीसह पाच दिवसांचा बाप्पा निरोप घेत असल्याने पाच दिवसांचे आणि गौरी-गणपतींचे विसर्जन शनिवारी होत असून त्यामुळे यंदा दोन दिवसांची गर्दी एकाच दिवशी उसळली जात आहे. एका बाजूला पावसाच्या सरी आणि दुसरीकडे भाविकांची उसळलेली भक्ती यात पावसाची तमा न बाळगता गणपती बाप्पा मोरया याच्या घोषणा देत गणेश भक्त मंडळी बाप्पांना निरोप देत आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत महापालिकेच्या नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावांच्या विसर्जन स्थळांच्या ठिकाणी एकूण १०३१ गणेश मूर्तींसह गौरींचे विसर्जन पार पडले होते.
(हेही वाचा – Green Chillies Price : हिरव्या मिरचीला दर नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त)
श्री गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मुंबईत ७३ नैसर्गिक स्थळी गणेश मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय मुंबईतील विविध ठिकाणी १९१ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासर्व विसर्जन स्थळांवर महापालिकेच्यावतीने गणेश भक्तांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. बुधवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन यासर्व विसर्जन स्थळांवर सुरळीत पार पडल्यानंतर शनिवारी पाच दिवसांच्या तसेच गौरी गणपतीच्या बाप्पांना पंचपंक्वांनाच्या नैवेद्य आस्वाद देत त्यांची मनोभावे सेवा केल्यानंतर निरोप देत आहेत. (Ganesh Festival)
शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकूण १०३४ गणेश मूर्ती व गौरींचे विसर्जन पार पडले. त्यामध्ये सार्वजनिक ०८, घरगुती ९१० आणि गौरी ११६ आदी मूर्तींचा समावेश होता. तर मुंबईतील १९१ कृत्रिम तलावांच्या विसर्जन स्थळांवर ४४९ गणेश मूर्ती आणि गौरींचे विसर्जन पार पडले. त्यामध्ये सार्वजनिक ०२, घरगुती ३९४ आणि गौरी ५३ आदी गणेश मूर्तींचा समावेश होता. त्यामुळे एकूण गणेश मूर्ती विसर्जनाच्या सरासरी ३० ते ३५ टक्के गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यावर भाविकांचा भर होता,हे या आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे. (Ganesh Festival)
सायंकाळी सहा वाजेपर्यंत गणेश मूर्ती विसर्जन
सार्वजनिक गणेश मूर्ती : ६१
घरगुती गणेश मूर्ती : ७३९८
गौरी : ७३९
कृत्रिम तलावातील गणेश मूर्ती
सार्वजनिक गणेश मूर्ती : २९
घरगुती गणेश मूर्ती : ३११९
गौरी : ३००
हेही पहा –
Join Our WhatsApp Community