I.N.D.I.A आघाडीचे शरद पवार चक्क गौतम अदानींच्या घरी

156

एका बाजूला I.N.D.I.A आघाडीत काँग्रेस पक्ष गौतम अदाणीच्या नावाने मोदी सरकारला कायम धारेवर धरत असतो. काँग्रेसचे नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत असतात, तर दुसरीकडे याच आघाडीचे समन्वयक एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे वारंवार अदानींना भेटत असतात. आघाडीतील हा विरोधाभास अनेकदा वैचारिक मतभेद दर्शवत असतो. शनिवार, २३ सप्टेंबर राय शरद पवार पुन्हा एकदा अदानींच्या घरी गेले होते.

नेहमीप्रमाणे या भेटीचे कारण शरद पवार किंवा अदानी या दोघांनी अधिकृतपणे सांगितले नाही. मात्र, एका खासगी कार्यक्रमासाठी शरद पवार हे अदानींच्या घरी गेल्याचे बोलले जात आहे. ही भेट अदानींच्या अहमदाबाद येथील निवासस्थानी झाली. विशेष म्हणजे पवार तिथेच मुक्काम करणार आहेत. या वर्षातील शरद पवार आणि गौतम अदानी यांची ही तिसरी भेट आहे.

हेही पहा –

हिंडेनबर्ग अहवालावर अदानींची पाठराखण

हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींची जेपीसी चौकशी करण्याची मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. मात्र, शरद पवार यांनी जेपीसी चौकशीतून फारसा फायदा होणार नाही तसेच हिंडेनबर्गचा अहवाल किती विश्वासार्ह मानायचा?, असा सवाल करून अदानींची पाठराखण केली होती.

(हेही वाचा प्रज्ञान रोव्हर, विक्रम लँडर स्लिपमोड मध्येच; ISROचे प्रयत्न सुरूच )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.