Gang Defrauding : बँका आणि गरजवंत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ३ महिलांसह ७ जणांना अटक

मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ३च्या पथकाने याप्रकरणी ७ जणांच्या टोळीला अटक केली असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे.

145
Gang Defrauding : बँका आणि गरजवंत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ३ महिलांसह ७ जणांना अटक
Gang Defrauding : बँका आणि गरजवंत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ३ महिलांसह ७ जणांना अटक

बोगस कागदपत्रे तयार करून बँकांकडून गृहकर्ज तसेच क्रेडिट कार्ड मिळवून बँक आणि गरजवंतांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ३च्या पथकाने याप्रकरणी ७ जणांच्या टोळीला अटक केली असून त्यात तीन महिलांचा समावेश आहे. या टोळीच्या म्होरक्याला दोन वर्षांपूर्वी गुन्हे शाखेने अटक केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा बँक आणि लोकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली होती.

प्रदीप मौर्या (४९), अब्दुल आहाद इजारूल हक शेख (४४), कादर परमार (४३), जगदीश जामसांडेकर (५३), मिनाक्षी शीरधनकर (३५), सुषमा उर्फ शिल्पा मोहिते (४०) आणि मंजू गायकवाड (३९) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीचे नाव आहे. ही टोळी भांडुप, कुर्ला, मुलुंड आणि नालासोपारा परिसरात राहणारी आहे. या टोळीजवळून पोलिसांनी ५९ हजार रुपयांची रोकड, बनावट रबरी शिक्के, ६ आधारकार्ड, विविध बँकांचे क्रेडिट आणि डेबिट कार्ड आणि विविध कंपन्यांचे मोबाईल कार्ड हस्तगत करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बंद दाराआड चर्चा

या टोळीचा प्रमुख प्रदीप मौर्या हा असून त्याच्यावर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल असून त्याला २०२१ मध्ये गुन्हे शाखा कक्ष ५च्या पथकाने बोगस कागदपत्राच्या आधारावर मोटारी खरेदी करून बँकांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. ही टोळी गरजवंत मध्यमवर्गीय लोकांना गाठून त्यांना बँकांकडून क्रेडिट कार्ड आणि कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली या ग्राहकांच्या नावावर बोगस दस्तावेज तयार करून त्या आधारावर क्रेडिट कार्ड खरेदी करीत, त्यानंतर विविध बँकांकडून गृहकर्ज काढून बँक आणि ग्राहकांची फसवणूक करीत होती.

या टोळीने यासाठी भांडुप येथे एक कार्यालय भाड्याने घेतले होते, त्या कार्यालयाला व्यवसायिक कार्यालय दाखवून व्हेरिफिकेशन साठी येणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना कार्यालय दाखवून कर्ज मंजूर करून घेत. या टोळीतील महिला ग्राहक आणणे इत्यादी कामे करीत होती मोबदल्यात त्यांना मौर्या कडून मोठे कमिशन मिळत असे अशी माहिती पोलिसांनी दिली. कक्ष ३ च्या पथकाने या टोळीला शुक्रवारी मुंबईतील विविध ठिकाणाहून अटक केली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा कक्ष ३चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. निसर्ग ओतारी, सपोनि. प्रकाश लिंगे, समीर मुजावर आणि पथक यांनी केली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.