काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा हिंदुविरोधी वक्तव्य केले आहे. संसदेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे मंदिरातील मूर्तीसारखे असतात. फक्त दाखवण्यासाठी आहेत. त्यांना कोणताही अधिकार नाही, अशा प्रकारे गांधी यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी (Rahul Gandhi) हे महिला आरक्षण आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) याविषयावर काँग्रेसची भूमिका मांडत होते. त्यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. राहुल गांधी म्हणाले, लोकसभेला लोकशाहीचे मंदिर म्हटले जाते. तुम्ही भाजपच्या कोणत्याही खासदाराला विचारा की, तो काही निर्णय घेतो का? कोणी कायदे करतो का? कायदे बनवण्यात कोणी सहभाग घेतो का? उत्तर नाही येईल. या लोकसभेतील काँग्रेसचा खासदार किंवा भाजपचा खासदार किंवा भारतातील कोणताही खासदार निर्णय घेत नाही. खासदारांना मंदिरातील मूर्तींप्रमाणे मूर्ती बनवण्यात आले आहे. आणि तिथे ओबीसींचे पुतळे आहेत, पण सत्ता अजिबात नाही. देश चालवण्यात सहभाग नाही.
(हेही वाचा Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बंद दाराआड चर्चा)
Join Our WhatsApp Community