चीनच्या हांगझू या शहरात यावर्षीची म्हणजेच १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games 2023) आयोजित करण्यात आली आहे. हांगझू शहरातील स्पोर्ट्स पार्क स्टेडियमवर या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगही उपस्थित होते. तर या वेळी भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि बॉक्सर लव्हलीन बोरगोहेन यांनी तिरंगा घेऊन जाणाऱ्या भारतीय तुकडीचे नेतृत्व केले.
या सोहळ्यातून (Asian Games 2023) चीनचा समृद्ध वारसाचे दर्शन घडले. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि इको-फ्रेंडली तंत्रज्ञानासह देशाचा आधुनिक दृष्टिकोन येथे मांडण्यात आला आहे. यावेळी भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि बॉक्सर लव्हलीन बोरगोहेन यांनी तिरंगा घेऊन या स्पर्धेतील भारतीय तुकडीचे नेतृत्व केले.
या खेळांमध्ये भारतातील 655 खेळाडू 40 खेळांमध्ये सहभागी होत आहेत. 40 खेळांमध्ये 481 स्पर्धा होतील, ज्यामध्ये 45 देशांतील खेळाडूंचा समावेश असेल.
(हेही वाचा – Ganapati Bappa Morya : निरोप घेता देवा, आम्हा…)
टेबल टेनिसच्या पुरुष संघाकडून विजयाचा श्रीगणेशा
या आशियाई स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूंनी (Asian Games 2023) विजयाचा श्रीगणेशा केला आहे. भारतीय पुरुष संघाने ताजिकिस्तानचा पराभव करून पहिल्या गेममध्ये मानवने 11-8, 11-5, 11-8 असा सामना जिंकून भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर मानुष शाहने सुलतानोवचा 13-11, 11-7, 11-5 अशा फरकाने पराभव केला.
अखेरीस, भारताच्या हरमीत देसाईने इस्माइला जोडाविरुद्ध (Asian Games 2023) तिसरा गेम 11-1, 11-3, 11-5 अशा फरकाने जिंकला आणि टीम इंडियाला पहिल्या फेरीत सहज विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने अंतिम 16 मध्ये प्रवेश केला आहे.
हे सर्व गेम्स भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येतील. तर सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी ६:३० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत खेळवले जातील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community