येरवडा मध्यवर्ती कारागृहातील (Yerwada Jail) जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आणि मनीऑर्डरमध्ये घोटाळा करून तब्बल २६ लाख रुपये हडपल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सचिन रघुनाथ फुलसुंदर असे या कैद्याचे (Yerwada Jail) नाव आहे. २००६ साली बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्ह्याखाली त्याला अटक करण्यात आली होती. फेब्रुवारी २०२१ ते ऑगस्ट २०२३ यादरम्यान त्याने कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी यांची नजर चुकवून कारखाना विभागात होणाऱ्या वस्तू बाहेर पाठवण्याच्या मदतीचा बहाणा केला. तुरुंगातील कारखाना विभागात वारंवार येऊन त्याने तेथील अधिकारी आणि कर्मचारी यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. तो १४ वर्षांपासून कारागृहात बंदिस्त असल्याने कामानिमित्त मुख्य प्रवेशद्वारावर आला तरी तेथील कर्मचारी त्याला अडवत नसत. या संधीचा फायदा घेऊन त्याने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फसवणूक केली. कर्मचाऱ्यांची नजर चुकवून अधिकारी ज्याप्रमाणे कैद्यांच्या नातेवाईकांनी पाठवलेल्या मनिऑर्डरच्या नोंदी घेतात, त्याप्रमाणे तो खोट्या नोंदी करत असे. हुबेहूब खोटी सही, खोटी रक्कम नोंद करत असे तसेच खोटे हिशोबही तयार करत असे आणि रजिस्टर न्याय विभागात आणून ठेवत असे.
(हेही वाचा – Vande Bharat Express : आजपासून ९ ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू होणार)
येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या मनीऑर्डरची नोंद ठेवल्या जाणाऱ्या २ ए क्रमांकाच्या रजिस्टरमध्ये क्रमांकात त्याने फेरफार केला. याशिवाय कारागृह अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या, दिनांक, खोटे हिशेब तयार करून किरकोळ रकमा स्वत:च्या आणि इतर कैद्यांच्या नावे दाखवल्या. इतकेच करून न थांबता त्याने ही रक्कम परस्पर वापरून एकूण २६ लाख ६९ हजार ९११ रुपये हडपले.
हे प्रकरण जेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांच्या (Yerwada Jail) लक्षात आले तेव्हा येरवडा कारागृहाचे तुरुंग अधिकारी बापूराव भिमराव मोटे यांनी सचिन फुलसुंदर याच्याविरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. येरवडा पोलिसांनी मनीऑर्डरची सगळी हस्तलिखित कामे बंद करून ‘ई-प्रिझन’ सॉफ्टवेअरच्या साहाय्याने कामे करण्याचे आदेश पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. या प्रकरणामुळे भविष्यात असे गैरप्रकार रोखण्यासाठी कारागृहातील सर्व मनीऑर्डरची कामे ऑनलाईन स्वरुपात होणार आहेत, असे मत (Yerwada Jail) येरवडा कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ यांनी व्यक्त केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community