Cyber Fraud : पुण्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ, आठ महिन्यात २० कोटी रुपयांची फसवणूक

पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या अनेक महिन्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र यावर अजूनही तपास सुरू आहे

162
Cyber Fraud : पुण्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ, आठ महिन्यात २० कोटी रुपयांची फसवणूक
Cyber Fraud : पुण्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ, आठ महिन्यात २० कोटी रुपयांची फसवणूक

पुणे शहरात ऑनलाईन फसवणुकीच्या (Cyber Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जानेवारी २०२३ ते ३१ ऑगस्टपर्यंत हजारांहून जास्त गुन्ह्यांचे अर्ज पोलिसांकडे दाखल झाले आहेत. यामध्ये ऑनलाईन गुन्ह्यामध्ये २० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक करण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे गेल्या अनेक महिन्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र यावर अजूनही तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक प्रकार सायबर (Cyber Fraud) चोरटे आजमावतात. या फसवणुकीबाबत काळजी घेणे, सावधानता बाळगणे आणि सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

(हेही वाचा-Ajit Pawar : ‘माझ्याकडील अर्थखाते पुढे टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही’, अजित पवारांच्या विधानामुळे चर्चेला उधाण)

मोबाईल फोनची गॅलरी तारण ठेवणे, तातडीने कर्ज उपलब्ध असल्याचे मेसेज करून ऑनलाईन फसवणूक करणे, फोटो मॉर्फ करून पैशांची मागणी करणे या पद्धतीने अनेक लोकांची फसवणूक केली जाते तसेच तातडीने कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत ब्लॅकमेकिंग करण्याचा फसवणुकीचा प्रकार पुण्यात सर्रास मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पुणे सायबर पोलीस स्थानकात ८ महिन्यांत आतापर्यंत २० कोटी रुपये गमावल्याची नोंद पुणे सायबर पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली असून १११४ विविध गुन्ह्यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.