तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकाराची घटना ताजी असतानाच पुन्हा नाशिकमधील म्हसरूळ परीक्षाकेंद्रात हायटेक कॉपीचा (High-Tech Copy) प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे हे परीक्षा केंद्र आता पुन्हा चर्चेत आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कॉपी करणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे.
म्हसरूळ परिसरातील पुणे विद्यार्थी गृह येथे शुक्रवारी दुपारी घेण्यात आलेल्या कृषी विभागातील विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षेत इलेक्ट्रॉनिक साहित्य घेत परीक्षा केंद्रात गेलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. सूरज विठ्ठलसिंग जारवाल (२३, रा. जारवालवाडी, बदनापूर, जालना) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. (High-Tech Copy)
(हेही वाचा-Onion Traders Strike : कांदा व्यापाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच)
सूरज दुपारी साडेबारा ते अडीच या कालावधीत परीक्षेसाठी केंद्रात गेला तेव्हा त्याची चौकशी करताच तो परीक्षा केंद्रातून पळून गेला. इतर सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून त्याला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या खिशात मोबाईल आणि पायातील सँडलमध्ये डिव्हाईस लपवली होती शिवाय कपड्याच्या आतल्या बाजूला एक पाकीट लावून फोटो काढण्यासाठी पाकिटाला छिद्र असल्याचेही दिसले.(High-Tech Copy)
पोलिसांकडे या घटनेची तक्रार करताच पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतले. शुक्रवारी रात्री सूरजविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्याकडील इलेक्ट्रॉनिक साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. त्याच्या इतर साथीदारांचाही पोलीस शोध घेत आहेत.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community