नागपुरात सध्या (Nagpur Flood) पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे. शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस पडला. या पावसामुळे नागपुरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अशातच अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचं पाणी शहरात शिरलं, त्यामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.
तीन लोकांचा मृत्यू
एनडीआरएफ व बचाव पथकाच्या जवानांकडून (Nagpur Flood) सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून आतापर्यंत ४०० लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांना एक दिवस सुटी जाहीर केली होती.
शुक्रवारी मध्यरात्री पासून विजेच्या कडकडाटासह सुरु असलेला मुसळधार पाऊस (Nagpur Flood) शनिवारी २३ सप्टेंबर सकाळी ८ वाजेपर्यंत सुरूच होता. त्यामुळे त्या काही तासांमध्ये एकूण ११६.५ मिमी पावसाची नोंद नोंदवण्यात आली. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, त्यापैकी ९० मिमी पाऊस हा रात्री २ ते पहाटे ४ या दोनच तासांत कोसळला. त्यामुळे प्रमुख रस्त्यांना नद्यांचे रूप आले होते. एनडीआरएफ व बचाव पथकाच्या जवानांनी ४०० हून अधिक नागरिकांना पुरातून (Nagpur Flood) सुरक्षितस्थळी हलवले. काही ठिकाणी तर बोटींचाही वापर करावा लागला. मात्र दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. यापूर्वी २६, २७, २८ व ३१ जुलै रोजीही नागपुरात मुसळधार पाऊस झाला होता. २७ जुलै रोजी सर्वाधिक सरासरी १७३.७ मिमी नोंद झाली होती. सप्टेंबरच्या महिनाभरात नागपुरात सरासरी १८३ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असताना त्यापैकी ६४% (११६.५) पावसाची शनिवारी एकाच दिवशी नोंद झाली आहे.
(हेही वाचा – Monsoon Update : पुढील दोन – तीन दिवसांत कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता)
पावसाचा हाहाकार
नागपूर शहराच्या (Nagpur Flood) एसटी स्टँडमध्येही पाच ते सात फूट पाणी शिरलं आहे. पुलाखालीही प्रचंड पाणी भरल्याने कार पाण्यात बुडाल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे. आजची सकाळ नागपूरकरांसाठी अत्यंत त्रस्त करणारी ठरली आहे. दुसरीकडे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं आहे.
नुकसानग्रस्तांना १० हजारांची तर दुकानदारांना ५० हजारांपर्यंत मदत
या सर्व परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आतापर्यंत तीन मृत्यू झाले. १४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. शिवाय १० हजार लोकांच्या घरात पाणी शिरलं (Nagpur Flood) आहे. काही लोकांना बाहेर शिफ्ट करावे लागले आहे. त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंचनामे करून तातडीची मदत म्हणून १० हजार रुपये देणार आहोत. तर दुकानदारांना ५० हजारांपर्यंत मदत देण्यात येईल. त्यासोबत महापालिका गाळ काढण्यास कार्यवाही करणार असल्याचे फडणवीसांनी नमूद केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community