यंदाच्या सर्व प्रकारच्या निर्बंधमुक्त गणेशोत्सवात दीड दिवसांच्या बाप्पांचे प्रमाण कमी झाले असले तरी यंदा पाच दिवस आणि गौरी गणपतीच्या (Gauri – Ganapati) बाप्पांचे प्रमाण अधिक वाढल्याचे एकूण विसर्जनाच्या आकडेवारीवरुन समोर येत आहे. एरव्ही पाच दिवसांचे आणि गौरी गणपती हे सहाव्या दिवशी जात असले तरी यंदा हा योग एकाच दिवशी जुळून आला. त्यामुळे पाच दिवसांचे आणि गौरीसह जाणाऱ्या बाप्पांना भक्तांनी निरोप दिला.
शनिवारी पाच दिवसांच्या श्री गणरायांसह गौरी गणपतीच्या (Gauri – Ganapati) एकूण ८१,५७० गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. तर मागील वर्षी पाचव्या आणि सहाव्या दिवसांच्या एकूण ७९ हजार ४०४ मूर्तींसह गौरींचे विसर्जन झाले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत पाच दिवस आणि गौरी गणपतीच्या मूर्तीमध्ये यंदा सुमारे २,०८६ ने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गौरी गणपती (Gauri – Ganapati) हे पाचव्या दिवशीच गावाला निघाल्याने शनिवारी रात्री उशिरापर्यंत समुद्र किनारे आणि तलाव आदी महापालिकेच्या नैसर्गिक विसर्जन स्थळांसह कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जन पार पडले. या सर्व ठिकाणी रात्री उशिरापर्यंत ८१ हजार ५७० गणेश मूर्तींचे विसर्जन पार पडले. यात सार्वजनिक १४३२, घरगुती ७२,३६५ आणि ७७७१ गौरींचा समावेश होता.
(हे