राष्ट्रवादी (Ajit Pawar) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे संसदेच्या विशेष अधिवेशनच्या निमित्ताने दिल्लीला गेले होते. संसदेत मंगळवार, १९ सप्टेंबर रोजी महिला आरक्षणाचे विधेयक मांडण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाली. या भेटीचा त्या दोघांनी एकत्र फोटोही काढला, त्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चेला उधाण आले.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल (Ajit Pawar) यांची राज्यसभेत कॅफेटेरिया येथे भेट झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या. या सर्व नेत्यांनी नवीन राज्यसभा सभागृहात एकत्रित फोटो काढला.
या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या त्या फोटोवरून अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला असता “मला त्याबद्दल काही बोलायचं नाही” असं उत्तर त्यांनी दिलं.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, “मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. याचा फोटो त्याचा फोटो ते माझं काम नाही. तु्म्ही विकासाबद्दल मला विचारा. विकास करण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे आणि आमचं काम सुरू आहे. मी सातत्याने महाराष्ट्रात फिरताना प्रश्न सोडवण्यासाठी बैठका आणि आढावा घेतोय त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहे. ” अशा शब्दांत अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community