विश्वाला शांती आणि एकतेचा संदेश देणाऱ्या आदिगुरु शंकराचार्य (Adiguru Shankaracharya) यांच्या १०८ फूट उंचीच्या पुतळ्याचे ‘स्टॅच्यू ऑफ वननेस’चे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते नुकताच अनावरण सोहळा पार पडला. यावेळी खंडवा येथील ओंकारेश्वर येथे मोठ्या संख्येने साधु, संत उपस्थित होते तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अद्वैत धामाची पायाभरणी आणि सपत्नीक भूमिपूजनही करण्यात आले.
नर्मदा नदीच्या काठावर हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. अखिल भारताच्या एकात्मतेची मूर्ती घडवणाऱ्या अद्वैतवादी वैदिक तत्त्वज्ञानी आदिगुरु शंकराचार्य (Adiguru Shankaracharya) यांनी भारतखंडाच्या चारही कोपऱ्यात वैदिक धर्माची ध्वजा रोवली. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणार्थ त्यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. ओंकारेश्वर येथे त्यांनी ४ वर्षे वास्तव्य केले होते. त्यांच्या विचारांचे संपूर्ण जगाला आकलन व्हायला हवे, असे उद्गगार या सोहळ्यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काढले आहेत.
(हेही वाचा-USA Vs China : चीन युद्धाच्या तयारीत; अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार निक्की हेली यांची चेतावणी)
पर्यावरणस्नेही प्रकल्प
मध्य प्रदेश सरकारकडून अद्वैत वेदांताचे जागतिक केंद्र म्हणून ओंकारेश्वरला विकसित केले जाणार आहे. ओंकारेश्वर ही आदिगुरु शंकराचार्य (Adiguru Shankaracharya) यांची दीक्षाभूमी आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अद्वैत लोकची स्थापना केली जाणार आहे तसेच वाटिका, वैदिक संस्थेची स्थापना, संग्रहालय, पुस्तकालय, लाइट अँड साउंड शो, नौकाविहार, इत्यादी सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. याशिवाय येथे गुरुकुलाचीही स्थापना होणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणस्नेही असून याची संपूर्ण निर्मिती भारतीय मंदिर स्थापत्य शैलीत केली जाणार आहे.
पुतळ्याचा पाया ७५ फूट आणि वजन १०० टन
सुप्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी बाल शंकराचार्य यांचे चित्र तयार केले होते. त्या धर्तीवर सोलापूर येथील शिल्पकार भगवान रामपुरे यांनी आदि शंकराचार्यांचा १०८ फूट उंच पुतळा बनवला आहे. या पुतळ्याचा पाया ७५ फूट उंचीचा असून, पुतळ्याचे वजन १०० टन आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community