Khalistan In Canada : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून खलिस्तान समर्थकांची नवी यादी जाहीर; काय होणार कारवाई ?

138
Khalistan In Canada : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून समर्थकांची नवी यादी जाहीर; मालमत्ता जप्त करण्याची तयारी
Khalistan In Canada : राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून समर्थकांची नवी यादी जाहीर; मालमत्ता जप्त करण्याची तयारी

शीख फॉर जस्टिसचा प्रमुख आणि खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूची चंदीगड आणि अमृतसरमधील मालमत्ता जप्त केल्यानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने खलिस्तानी समर्थकांची नवीन यादी जारी केली आहे. (Khalistan In Canada) या यादीत परमजीत सिंग पम्मा, कुलवंत मुथडा, सुखपाल सिंग, सरबजीत बेनूर, कुलवंत, गुरप्रीत सिंग, हरजप, हरप्रीत सिंग, रणजीत नीता, गुरमीत सिंग, जसमीत हकीमजादा, गुरजंत धिल्लॉन, लखबीर रोडे, अमरदीप पुरेवाल, जतिंदर डी जेतवाल, जतिंदर डी. एस हिम्मत सिंग, वाधवा सिंग (बब्बर काका) आणि जे धालीवाल यांच्या नावांचा समावेश आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा या सर्वांची मालमत्ता जप्त करण्याची तयारी करत आहे. (Khalistan In Canada)

(हेही वाचा – Indus Appstore : फोन पे लाँच करणार स्वत:चे ॲप स्टोअर; गूगलला आव्हान)

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने शनिवारी अमृतसरच्या खानकोट गावात गुरुपतवंत सिंग पन्नूची 46 कनाल जमीन जप्त केली. ही शेतजमीन आहे. खानकोट हे पन्नूचे वडिलोपार्जित गाव आहे. त्याचे चंदीगडमधील सेक्टर 15 सी येथील घरही जप्त करण्यात आले आहे. यापूर्वी 2020 मध्ये त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. पन्नू हा शिख फॉर जस्टिस या खलिस्तानी दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. नुकत्याच झालेल्या कॅनडा-भारत वादात त्याने कॅनडात राहणाऱ्या हिंदूंनाही धमकावले होते. (Khalistan In Canada)

तसेच जालंधरमधील दहशतवादी निज्जरची मालमत्ताही जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता आता सरकारच्या ताब्यात आहे. भारत सरकारने 2019 मध्ये पन्नूच्या शीख फॉर जस्टिस संघटनेवर बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा म्हणजेच Unlawful Activities (Prevention) Act अंतर्गत बंदी घातली होती. यासंबंधीच्या गृहमंत्रालयाच्या अधिसूचनेत असे म्हटले आहे की, शीख जनमताच्या नावाखाली शीख फॉर जस्टिस ही संघटना पंजाबमध्ये फुटीरतावाद आणि अतिरेक्यांना प्रोत्साहन देत आहे. (Khalistan In Canada)

कॅनडात मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या पंजाबमधील घरावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने मालमत्ता जप्तीची नोटीस चिकटवली आहे. निज्जर याचे घर जालंधरच्या भारसिंहपुरा (फिल्लौर) गावात आहे. हरदीपसिंग निज्जरची स्थावर मालमत्ता जप्त करण्यासाठी एनआयएने याचिका दाखल केल्याचे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी 11 ऑक्टोबर रोजी मोहालीच्या विशेष एनआयए न्यायालयात नातेवाईक आणि जवळचे लोक त्यांची बाजू मांडू शकतात. (Khalistan In Canada)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.