कोकणचे लाडके दैवत असलेल्या गणपत्ती बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देऊन चाकरमानी आता पुन्हा आपल्या कामावर हजर होण्यासाठी परतत आहेत. त्यामुळे कोकण मार्गावरील गाड्यांना दिवसरात्र मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. भरगच्च भरलेल्या ट्रेन, (KokanRailway) खड्डेमय रस्ते असा खडतर प्रवास करुन चाकरमानी कोकणात पोहोचला होता. पण आता घरी परतानाही व्यवस्थित प्रवासाची सोय नसल्याचे पाहायला मिळत आहे. रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या स्पेशल ट्रेन तब्बत चार तास लेट असल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. तर दुसरीकडे, चिपळूणमध्ये प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
रेल्वेगाड्या उशीरा धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकामध्ये प्लॅटफॉर्म वरील प्रवाशांना रेल्वेत शिरता आले नाही म्हणून रेल्वे मधील आणि प्लॅटफॉर्म मधील प्रवाशांमध्ये काही प्रमाणात धक्काबुक्की देखील झाली. आधीच्या स्थानकातून रेल्वे गाड्या खचाखच भरून आल्याने तसेच आत मधून दरवाजे बंद केल्याने खेड स्थानकातील प्रवाशांना आत मध्ये शिरता येत नसल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
(हेही वाचा : Hydrogen Bus : फक्त हवा आणि पाण्यावर चालणारी भारतातील पहिली हायड्रोजन बस होणार सुरु)
मुंबईच्या दिशेने जाणारी मंगला एक्सप्रेस च्या इंजिन समोर उभे राहून काही संतप्त प्रवाशांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.कोकण कन्या, गणपती स्पेशल, तुतारी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांमधून चाकरमानी मुंबईकडे परतीचा प्रवास करणार आहेत.परतीच्या प्रवासावेळी रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, गणपती स्पेशल गाड्या ४ तास. तुतारी एक्स्प्रेस १. ३० तास उशिराने धावत आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने राखीव पोलीस दलाची कुमक तैनात केली आहे. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान या गाड्यांमध्ये सुमारे २०० सुरक्षा रक्षक बंदोबस्त ठेवत आहेत. दिवसभर रत्नागिरीचे रेल्वे स्थानक प्रवाशांनी गजबजलेले दिसत आहे.
हेही पहा –