Vande Bharat : आतापर्यंत १ कोटी ११ लाखांहून अधिक प्रवाशांनी केला ‘वंदे भारत’मधून प्रवास

134
Vande Bharat : आतापर्यंत १ कोटी ११ लाखांहून अधिक प्रवाशांनी केला 'वंदे भारत'मधून प्रवास
Vande Bharat : आतापर्यंत १ कोटी ११ लाखांहून अधिक प्रवाशांनी केला 'वंदे भारत'मधून प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ९ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. (Vande Bharat) रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणाऱ्या या रेल्वे गाड्या आता आणखी ९ मार्गांवर धावणार आहेत. रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उदयपूर – जयपूर, तिरुनेलवेली-मदुराई- चेन्नई, हैदराबाद-बेंगळुरू, विजयवाडा – चेन्नई (रेणूगुंटा मार्गे), पाटणा – हावडा, कासारगोड – तिरुवनंतपुरम, राउरकेला – भुवनेश्वर – पुरी, रांची – हावडा, जामनगर-अहमदाबाद या मार्गावर धावणार आहेत. या रेल्वेगाड्यांमुळे राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरात या अकरा राज्यांदरम्यान दळणवळण वाढीला लागेल. ‘या नऊ वंदे भारत गाड्यांचा एकाचवेळी शुभारंभ होणे म्हणजे देशातील आधुनिक दळणवळण सुविधा क्षेत्रासाठी अभूतपूर्व प्रसंग आहे’, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. वंदे भारत गाड्यांमधून आतापर्यंत एक कोटी अकरा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहितीही त्यांनी दिली. (Vande Bharat)

(हेही वाचा – MHADA : म्हाडाच्या घरांसाठी दहा दिवसात केवळ १०२६ अर्ज)

सध्या 25 वंदे भारत गाड्या, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकांना सेवा देत आहेत. त्यात आज आणखी ९ वंदे भारत जोडल्या जात आहेत. वंदे भारतने जोडलेल्या ठिकाणी, पर्यटनातही वाढ झाली असून त्यामुळे तिथल्या अर्थकारणाला चालना मिळत आहे. वाहतुकीचा एक प्रकार दुसऱ्या प्रकाराला पूरक असला पाहिजे. वाहतुकीच्या विविध प्रकारांचा समावेश असलेली दळणवळण व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे. सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी हे सर्व प्रयत्न आहेत. यंदा रेल्वेसाठीचे बजेट 2014 च्या रेल्वे बजेटच्या 8 पट आहे. त्याचप्रमाणे दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि नवीन मार्गांचे काम सुरू आहे. (Vande Bharat)

वंदे भारत सर्वात वेगवान रेल्वेगाड्या

या वंदे भारत रेल्वेगाड्या त्यांच्या प्रवासाच्या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वेगाड्या असतील आणि  सध्या या मार्गांवर धावणाऱ्या सर्वात वेगवान रेल्वेगाड्यांच्या तुलनेत, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि कासारगोड-थिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस सुमारे 3 तासांनी वेगाने धावेल; हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस 2.5 तासांपेक्षा जास्त वेगाने; तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस 2 तासांपेक्षा जास्त वेगाने; रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस, पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेस आणि जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस सुमारे 1 तास वेगाने तर उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास वेगाने धावतील.

महत्त्वाच्या धार्मिक स्थळी पोहोचणे सुविधाजनक

देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांदरम्यान दळणवळण सुधारण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस पुरी आणि मदुराई या महत्त्वाच्या धार्मिक शहरांना जोडतील. तसेच, विजयवाडा – चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस रेणूगुंटा मार्गे धावेल आणि तिरुपती तीर्थक्षेत्री जाण्यासाठी सुविधाजनक ठरेल. (Vande Bharat)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.