MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांसमोर सोमवारी होणार दुसरी सुनावणी

ही सुनावणी एक प्रकारे नियमित सुनावणी जरी असली तरी याकडे प्रक्रियात्मक दिशात्मक सुनावणी म्हणून पाहिलं जाणार आहे.

123
MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांसमोर सोमवारी होणार दुसरी सुनावणी
MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांसमोर सोमवारी होणार दुसरी सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी आमदार अपात्रता प्रकरणातील ( MLA Disqualification Case )दुसरी सुनावणी घेतली जात आहे. ही सुनावणी एक प्रकारे नियमित सुनावणी जरी असली तरी याकडे प्रक्रियात्मक दिशात्मक सुनावणी म्हणून पाहिलं जाणार आहे. यामध्ये सुनावणी प्रक्रियेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. म्हणजेच एक प्रकारे या प्रकरणातील सुनावणीचे वेळापत्रक समोर येण्याची शक्यता आहे. त्या वेळापत्रकानुसार या प्रकरणातील सुनावणी प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना उबाठा गटाने आमदार अपात्रतेच्या सुनावणीस उशीर होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेच्या कारवाईच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता सोमवारी (२५ सप्टेंबर)सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये सर्व आमदारांना हजर राहण्याची आवश्यकता नाही. आमदारांची बाजू त्या त्या गटाच्या वकिलांकडून सुनावणीमध्ये मांडली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांना आपण या सगळ्या आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये मागील चार महिन्यांमध्ये नेमक काय केलं? हे याची माहिती सादर करायची आहे.

(हेही वाचा : IND Vs AUS : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे आव्हान )

या प्रकरणातील मागील सुनावणी १४ सप्टेंबर रोजी पार पडली होती. त्यावेळी प्रत्येक आमदाराचे म्हणणे विधानसभा अध्यक्षांनी ऐकून घेतले होते. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्रे एकमेकांना देण्यासही सांगितले होते. त्याशिवाय, दहा दिवसांमध्ये याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शिवसेना शिंदे गटातील आमदारांना उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी वेळ दिला होता.मागील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौरा करत काही कायदे तज्ज्ञांचा या सगळ्या प्रकरणात सल्ला घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी अधिक विधानसभा अध्यक्षां समोर होणाऱ्या या प्रकरणातील सुनावणीला वेग आल्याचे पाहावयास मिळत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.