Onion auction : नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नप्रकरणी, लासलगावमध्ये शेतकरी संघटनेची सोमवारी बैठक

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने बैठकीचे आयोजन केले आहे

167
Onion auction : नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नप्रकरणी, लासलगावमध्ये शेतकरी संघटनेची सोमवारी बैठक
Onion auction : नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्नप्रकरणी, लासलगावमध्ये शेतकरी संघटनेची सोमवारी बैठक

नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या बंदचा (Onion auction ) रविवारी (२४ सप्टेंबर) पाचवा दिवस असून दिवसभर कांदा लिलाव ठप्प होते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दरम्यान आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्यावतीने बैठकीचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील लासलगाव  कांदा बाजारपेठ आवारात सोमवारी (२५ सप्टेंबर)बैठक होणार असून यानंतर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट केली जाणार आहे.

एकीकडे बुधवारपासून नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी संघटनाकडून बंद पुकारण्यात आला आहे. पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होऊनही तोडगा निघालेला नाही. त्याशिवाय व्यापारी संघटनांनी याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी जिल्ह्यातील व्यापारी एकत्र आले, मात्र यानंतरही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला दोन दिवस उलटुन गेले असून मंगळवारी पणनमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन आहे. मात्र दुसरीकडे या बंद दरम्यान लिलावच ठप्प असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर आता शेतकरी संघटना एकवटल्या असून लासलगावमध्ये महत्वाची बैठक सकाळी १० वाजता बोलावण्यात आली आहे.
(हेही वाचा : Gadchiroli Naxalist : गडचिरोली येथे माओवाद्यांकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त; गडचिरोली पोलिसांना मोठे यश)

कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क हटवणे, नाफेड  व एनसीसीएफचा कांदा बंद करणे आणि नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनकडून जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद ठेवले आहे. यावेळी जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी शेतकऱ्यांची भूमिका काय असणार आहे, हे पाहावे लागणार आहे. कारण गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोटींची उलाढाल ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
हेही पहा  –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.