IND Vs AUS : कांगारूंना २१७ धावांत गुंडाळले; भारताचा दणदणीत विजय

149
IND Vs AUS : कांगारूंना २१७ धावांत गुंडाळले; भारताचा दणदणीत विजय
IND Vs AUS : कांगारूंना २१७ धावांत गुंडाळले; भारताचा दणदणीत विजय

टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९९ धावांच्या (IND Vs AUS) मोठ्या फरकाने एकतर्फी पराभव केला आणि यासह मालिकाही जिंकली आहे. मोहालीमध्ये टीम इंडियाचा विजय सोपा वाटत होता, तर इंदूरमध्ये त्याचे पूर्ण वर्चस्व दिसून आले. तो विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या इतर ९ संघांसाठी एक मोठा इशारा आहे. इंदूरमध्ये, भारतीय फलंदाजांनी ३९९ धावांची मोठी धावसंख्या उभारली; परंतु विजयाचा खरा स्टार होता रविचंद्रन अश्विन आणि प्रसीध कृष्णा ! त्यांनी अतिशय सपाट खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा समाचार घेतला.

(हेही वाचा – Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतीय संस्कृती आणि भारतीय संगीत यांचा गौरव)

शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे ४०० धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पावसामुळे ऑस्ट्रेलियासमोर ३३ षटकांत ३१७ धावांचे आव्हान डकवर्थ लुईस नियमानुसार ठेवण्यात आले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाला गाठता आले नाही आणि भारताने विजयासह या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत खेळत असताना भारताने यावेळी ऑस्ट्रेलियाचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा जोरदर रंगत होती; पण भारताने हा सामना ९९ धावांनी जिंकला. (IND Vs AUS)

भारताने फलंदाजी तर दमदार कामगिरी केली, पण त्याचबरोबर गोलंदाजीतही त्यांनी छाप पाडली. ऑस्ट्रेलियाचा डाव सुरु झाला आणि त्यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने भारताला दुहेरी यश मिळवून दिले. जेव्हा ऑस्ट्रेलियाची ९ षटकांत २ बाद ५६ अशी स्थिती होती तेव्हा पाऊस पडला आणि जवळपास दीड तासाचा खेळ वाया गेला. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाला ३३ षटकांत विजयासाठी ३१७ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. पावसानंतर जेव्हा ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला तेव्हा त्यांचा डाव चांगलाच गडगडल्याचे पाहायला मिळाले. रवींचद्रन अश्विनने त्यानंतर तीन बळी मिळवले, तर दोन बळी मिळवत रवींद्र जडेजाने त्याला चांगली साथ दिली. भारताच्या फिरकी गोलंदाजीचे वर्चस्व यावेळ पाहायला मिळाले. विश्वचषकात नंबर-१ म्हणून प्रवेश करण्यासाठी संघाला मालिकेतील दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. (IND Vs AUS)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.