Janshatabdi Express : जनशताब्दी रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार, ताशी ८० किमी वेगाने चालणाऱ्या रेल्वेने घेतला आता ११०च्या गतीने वेग

प्रवाशांच्या वेळेची होणार बचत

164
Janshatabdi Express : जनशताब्दी रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार, ताशी ८० किमी वेगाने चालणाऱ्या रेल्वेने घेतला आता ११०च्या गतीने वेग
Janshatabdi Express : जनशताब्दी रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार, ताशी ८० किमी वेगाने चालणाऱ्या रेल्वेने घेतला आता ११०च्या गतीने वेग

मराठवाड्यातील जनतेला एका दिवसात मुंबईतील कामे आटोपून परत येण्यासाठी सोयीची असलेली जनशताब्दी एक्सप्रेस आता एलएचबी कोचसह इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार आहे. जालना-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस (Janshatabdi Express) ताशी ८० ते ९० किमीच्या वेगाने धावणारी ही गाडी आता ताशी १०० ते ११० गतीने धावणार असल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

सुरुवातीला ही रेल्वे छत्रपती संभाजीनगर ते सीएसटीएमपर्यंत होती. तांत्रिक अडचणींमुळे पुढे ही रेल्वे दादरपर्यंतच नेण्यात येऊ लागली. दुसऱ्यांदा या रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला. दरम्यान, रेल्वेगाडीमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. या गाडीला एलएचबी कोच जोडण्यात आले आहे. या कोचला थेट डिस्क ब्रेक जोडले असल्याने गाडीच्या वेगात वाढ झाली आहे. शिवाय प्रवाशांना अद्ययावत सुविधा या माध्यमातून उपलब्ध होत आहेत.

(हेही वाचा – India Smart Cities Council 2023 : इंदोर इथे २६-२७ सप्टेंबर रोजी होणार भारत स्मार्ट शहर परिषद , १०० स्मार्ट शहरे होणार सामील)

रूळ बदलल्याने गाडीला वेग
पूर्वी जालना येथून निघालेल्या या गाडीला मनमाड येथे थांबून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंजिन जोडावे लागत होते. कधी उपलब्ध नसल्यामुळे डिझेल इंजिनवरच गाडी न्यावी लागत होती. जालना ते मनमाड या मार्गावरील रेल्वे रुळांची दुरुस्ती केल्यामुळे आता या रुळावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची गती वाढली आहे. पूर्वी ७५ ते ८०च्या गतीने रेल्वे धावत होती. रुळ बदलल्याने ही गती वाढली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.