Raj Thackeray : गढूळ राजकीय वातावरणावर साहित्यिकांकडून ‘त्याच वेळी’ भाष्य होणं गरजेचं, राज ठाकरे यांचं परखड मत

148
Raj Thackeray : गढूळ राजकीय वातावरणावर साहित्यिकांकडून 'त्याच वेळी' भाष्य होणं गरजेचं, राज ठाकरे यांचं परखड मत
Raj Thackeray : गढूळ राजकीय वातावरणावर साहित्यिकांकडून 'त्याच वेळी' भाष्य होणं गरजेचं, राज ठाकरे यांचं परखड मत

गढूळ झालेल्या राजकीय वातावरणावर साहित्यिकांकडून त्याच वेळी भाष्य होणं गरजेचं आहे, असं परखड मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या अप्रकाशित कवितांच्या संग्रहाचं प्रकाशन रावण पब्लिशिंग हाऊसतर्फे ठाणे येथील टिपटॉप प्लाझा येथे करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, मराठीपण काय असते, हे जगाला कळण्यासाठी आपल्याकडील मराठी साहित्याचा इतर भाषांत अनुवाद होणे गरजेचे आहे. मी गेली अनेक वर्षे यासाठी प्रयत्न करतोय. चांगला अनुवाद करणारी माणसं शोधात आहे तसेच आपल्याच लोकांना आपण मोठं करत नाही. मी इंग्लंडला गेल्यावर शेक्सपियरचं घर पाहिलं. ते जपून ठेवण्यात आलं होतं. आमची माणसं किती मोठी होती. ती किती मोठी होऊन गेली हे सतत दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आपल्याकडे तसा प्रयत्न नसतो. आपल्याकडे संमेलने भरतात. लोकं येऊन बोलतात, पण पुढे काही होत नाही.

(हेही वाचा – Janshatabdi Express : जनशताब्दी रेल्वे इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार, ताशी ८० किमी वेगाने चालणाऱ्या रेल्वेने घेतला आता ११०च्या गतीने वेग)

भावी पिढीविषयी बोलताना त्यांनी प्रश्न केला आहे की, आपण कोण माणसं निवडून देतो, कोण आमच्यावर राज्य करतं, कोणाची किती लायकी आहे, ही गोष्ट जनतेला समजली पाहिजे. आजूबाजूचे राजकारण गढूळ होत आहे. भविष्यातील पिढ्यांना काय सांगणार आणि काय दाखवणार आहोत, असे प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

भारत, इंडिया किंवा हिंदुस्तान…
भारत, इंडिया, हिंदुस्तान…ही तीन नावं घ्यायला काय जातंय, कवी कुसुमाग्रजांची ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘पन्नाशीची उमर गाठली’… ही कविता मंत्रालयात लावली होती, पण जागा चुकली वाटतं, अशी फटकेबाजी करून ‘ही कविता महाराष्ट्रातील प्रत्येकाने वाचली पाहिजे’, असेही राज ठाकरे म्हणाले.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.