ऑस्ट्रेलियातील टाऊन्सविले, क्वीन्सलँड येथे ११ वे हिंदु मंदिर (Australia Hindu Temple) भक्त, भाविकांसाठी खुले झाले आहे. बीएपीएस स्वामीनारायण संप्रदायाचे प्रमुख, भक्त आणि हितचिंतक यांच्या उपस्थितीत या नवीन बीएपीएस मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा २ दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी टाऊन्सविलेचे महापौर जेनी हिल आणि क्वीन्सलँडचे पोलीस निरीक्षक जॅकी हनीवुड यांनी त्यांच्या विभागातील इतर अधिकाऱ्यांसह टाऊन्सविले एस्प्लनेडच्या बाजूने दीड किलोमीटर अंतरावर मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ते सहभागी झाले होते. सायंकाळी बीएपीएस मंदिराच्या उद्घाटनानिमित्त स्वामींनी आणि तरुणांनी भक्तिगीते गायली. ३ सप्टेंबर रोजी सकाळी बीएपीएस भक्त आणि टाऊन्सविले येथील स्थानिक हिंदू समुदायाच्या सदस्यांनी वैदिक महापूजेत भाग घेतला. यानंतर परमचिंदनदास स्वामी आणि इतर स्वामींच्या हस्ते वैदिक मंदिराचा उदघाटन सोहळा पार पडला.
(हेही वाचा – Ajit Pawar : राष्ट्रवादी कोणाची? अजित पवारांच्या विधानामुळे पुन्हा चर्चेला उधाण)
या सोहळ्यावेळी पार पडलेले पवित्र संस्कार, देवी मूर्तींना नैवेद्य अर्पण करण्यात आला. यापूर्वी १२ जानेवारी २०२२ रोजी अटलादारा येथील मूर्तींचा वैदिक मूर्ती अभिषेक विधी महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community