मागील काही दिवसांपासून भाजपच्या नेत्यांचे ऑडिओ, व्हिडीओ क्लिप वायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता (Chandrasekhar Bawankule) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. त्या क्लिपमुळे बरीच चर्चा देखील रंगली. मात्र आता या सर्व प्रकरणावर स्वतः बावनकुळे याची स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, त्याचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
काय आहे वायरल झालेल्या क्लिपमध्ये?
नुकताच वायरल झालेली ऑडिओ क्लिप (Chandrasekhar Bawankule) ही भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमधील असल्याचे सांगितले जात आहे. या क्लिपमधून बावनकुळे आपल्या पदाधिकाऱ्यांना काही सूचना देत आहेत. “आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क रहावं. पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्या विरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे, म्हणजे समजलेच असेल तुम्हाला, त्यांना ढाब्यावरही घेऊन जा,” असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी दिला.
(हेही वाचा – Ajit Pawar : राष्ट्रवादी कोणाची? अजित पवारांच्या विधानामुळे पुन्हा चर्चेला उधाण)
या क्लिपचे बरीच चर्चा रंगली. त्यानंतर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असा दावा बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केला आहे. ते बोलताना म्हणाले पुढे की, “चुकीच्या चर्चा, बातम्या येऊ नयेत. तसेच एखादी घटना घडली नाही तरीही त्या घटनेच्या बातम्या येतात. छोटे-छोटे वेब पोर्टल अशा बातम्या चालवतात. कारण त्यांना त्याची पूर्ण माहिती नसते. जर उद्या एखादी बातमी निगेटीव्ह केली तर, त्यात आमचं काहीच मत नाही, तो तुमचा आधिकार आहे. पत्रकाराचा आधिकार आहे. पुर्ण स्वांतत्र्य आहे पत्रकारांना पण, आमचं त्यावर काय मत आहे, तेही समोर गेलं पाहिजे. जर आमचं मत जाणार नसेल तर ते एकतर्फी जाईल असं मी म्हटलं आहे, आणि त्यात काही गैर नाही.”
अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community