सप्टेंबर महिना संपण्यासाठी अवघे पाचच दिवस राहिले असताना याचा आता थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन कामकाजावर होणार आहे. आर्थिक व्यवहारातील अनेक नियम हे १ ऑक्टोबर पासून बदलणार आहे. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे २००० नोटा बदलून घेणे. (2000 Rupees Note)
अशा एकूण तीन गोष्टी बदलणार आहेत त्या कोणत्या ते आपण जाणून घेऊ.
दोन हजारांची नोट बदला
अजूनही तुमच्याकडे २००० रुपयांची नोट आहे का? असेल तर तुमच्याकडे आता कमी कालावधी उरला आहे. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलाव्या लागणार आहे. या नोटा बँकेत जमा करण्याची तारीख यानंतर वाढविण्यात येणार नाही. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. लक्षात ठेवा की रिझर्व्ह बँकेने लोकांना एका दिवशी २० हजार रुपयांपर्यंत म्हणजेच १० नोटा एकावेळी बदलण्याची सुविधा दिली आहे. त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. (2000 Rupees Note)
नाहीतर खाते होईल फ्रीझ
सेबीने डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यांमध्ये नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. त्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपेल. या तारखेपर्यंत कोणत्याही खातेदाराने नॉमिनेशन केले नाही तर ते खाते १ ऑक्टोबरपासून गोठवले जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही डीमॅट आणि ट्रेडिंग करू शकणार नाही.
(हेही वाचा : Chandrasekhar Bawankule : ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर बावनकुळे यांनी दिलं स्पष्टीकरण)
बचत खात्यासाठी आधार
आता छोट्या बचत योजनांमध्ये आधार अनिवार्य करण्यात आले आहे. पीपीएफ, सुकन्या समृद्धी, पोस्ट ऑफिस स्कीम इत्यादीमध्ये आधारची माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास १ ऑक्टोबर २०२३ पासून ही खाती गोठवली जातील.
हेही पहा –