कल्याण-नगर महामार्गावरील एका भरधाव येणाऱ्या कारने पाच परप्रांतीय मजुरांना चिरडले आहे. यामध्ये दोन मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला असून एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींवर आळेफाटा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याच्या शेतावर शेतमजूर म्हणून ते कामाला आले होते अशी माहिती समोर आली आहे. ही घटना रविवार २४ सप्टेंबर च्या रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावे आहेत. दिनेश जाधव आणि विक्रम तारोले अशी जखमी झालेल्या मजुरांची नावे आहेत. गाडीचे नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (Kalyan-Nagar Accidentt)
मध्यप्रदेशातील पाच शेतकरी कुटुंब तीन दिवसांपूर्वीच कल्याण महामार्गावरील डिगोरे परिसरात कामाच्या शोधा निमित्त वास्तव्यास आले होते. त्यानंतर त्यांनी मिळेल ते काम करायला सुरुवात केली. पाचही शेतमजुरांना एका शेतामध्ये मजुरीचे काम मिळाले होते . रविवारी रात्री आठच्या सुमारास आपलं काम उरकून पाचही शेतमजूर आपल्या घराकडे निघाले होते. कडेने पायी चालत जात असताना नगर – कल्याण महामार्गावर कल्याणकडून ओतूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी गाडीने या पाच मजुरांना चिरडले. ( Kalyan-Nagar Accident)
(हेही वाचा : Barsu Refinery Project : बारसू रिफायनरीचा मार्ग मोकळा; ‘ती’ कातळशिल्पे यादीतून वगळली?)
अपघात इतका भीषण होता की या घटनेमध्ये दोन मजुरांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. आणि अन्य तीन मजूर गंभीररित्या जखमी झाले होते. अपघातानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. तात्काळ घटनेची माहिती आळेफाटा पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचून जखमींना आळेफाटा येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. दरम्यान एक जखमी शेतमजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community