कोल्हापूरच्या पट्टणकोडोली येथील तुळजाभवानी मंदिरातून देवीच्या मूर्तीवरील दागिन्यांसह लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास (Kolhapur Robbery) केला. सोमवारी पहाटे पुजारी मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
कोल्हापुरातील पट्टणकोडोली येथील मराठा कॉलनीमध्ये श्री तुळजाभवानी मंदिर आहे. या मंदिरात रविवारी मध्यरात्री मंदिराच्या भिंतीवरून उडी मारून चोरट्यांनी प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी देवीचा चांदीचा मुकूट, कंबरपट्टा, देवीच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र या दागिन्यांसह मंदिराची दानपेटी फोडून जवळपास अडीच ते तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सोमवारी पहाटे ५ च्या सुमारास मंदिराचे पुजारी जयसिंग दळवी मंदिरात आले त्यावेळी दानपेटीतील पैशांची चोरी झाल्याचे आणि देवीच्या अंगावरील दागिनेही चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ मंदिराच्या विश्वस्तांना याबाबत माहिती दिली.
(हेही वाचा – 2000 Rupees Note : ऑक्टोबर पासून ‘या’ तीन गोष्टी बदलणार)
हुपरी पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही दिवसांपूर्वीच कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीनगर येथील गणेश मूर्तीवरील चांदीचे दागिने चोरीला गेले होते. त्यानंतर लगेचच ही घटना घडली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या घटनेचा शोध घेत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community