गिरगावातील केशवजी नाईक चाळीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे १३१वे वर्ष आहे. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने मुंबईतील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. उद्या, मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईमध्ये दाखल होणार असून गिरगावातील या मंडळास सदिच्छा भेट देणार आहेत. या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती मंडळाला लाभणार आहे.
“भारतीय समाजामध्ये एकी निर्माण व्हावी, जनजागृती व्हावी, सर्वांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यातूनच केशवजी नाईक चाळीत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली. स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती आणि आजचा काळ यामध्ये प्रचंड फरक असला तरी राष्ट्रासाठी एकत्र येणे, देशप्रेमाची भावना सतत जागरूक ठेवणे हे आजही तितकेच महत्त्वाचे आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या परंपरेचा वारसा अविरत पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया!”, असे मत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले आहे.
(हेही वाचा – Gauri – Ganapati : यंदा पाच दिवसांसह मुंबईत गौरी गणपतीत दोन हजारने वाढ )
Join Our WhatsApp Community