१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी भारताने नेमबाजीत पहिले सुवर्ण जिंकले होते.सुवर्णपदकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या ११७ धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा संघ २० षटकांत ८गडी गमावून ९७ धावाच करू शकला. आणि टीम इंडियाने हा सामना १९ धावांनी जिंकला.या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.(Asian Games 2023)
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात क्रिकेटचा समावेश होण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी, दोन वेळा क्रिकेट या खेळांचा भाग झाला तेव्हा भारताने त्यात भाग घेतला नव्हता. म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत पहिल्यांदाच क्रिकेट खेळत आहे. त्यातच पहिल्यांदाच महिला क्रिकेट संघाने हे घवघवीत यश मिळवुन नवीन इतिहास रचला आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला १६धावांवर शेफाली वर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर मंधाना आणि रॉड्रिग्समध्ये दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. (Asian Games 2023)
सर्वाधिक धावा करणाऱ्या मंधानाने ४५ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या. रॉड्रिग्सने ४० चेंडूत ४२धावा केल्या, ज्यात त्याने ५ चौकार मारले. या दोघांशिवाय दुसरी कोणतीही खेळाडू आपली छाप सोडू शकली नाही. त्यामुळे भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकात ७ गडी गमावून ११६ धावा केल्या.
(हेही वाचा : IND Vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खिशात घातल्यानंतर भारतीय संघाला मिळाली अजून एक ‘गुड न्यूज’
श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाच्या इनोका रणवीरा, सुगंधिका कुमारी आणि उदेशिका प्रबोधिनीने प्रत्येकी दोन गडी बाद केले.११७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवातही चांगली झाली नाही. त्याने १४ धावांत ३ विकेट गमावल्या आणि पहिल्या तीन विकेट तीतस साधूने घेतल्या. मात्र, यानंतर हसिनी परेरा आणि निलाक्षी डी सिल्वा यांनी शानदार फलंदाजी करत चौथ्या विकेटसाठी ३३ चेंडूत ३६ धावांची भागीदारी करत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले, मात्र राजेश्वरी गायकवाडने हसिनीला बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर लंकेचे फलंदाज काही खास करू शकले नाही आणि संघ २० षटकांत ८ विकेट गमावून केवळ ९७ धावा करू शकला आणि सामना १९ धावांनी गमावला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community