Pune Ganeshotsav 2023 : पुण्यातील श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारली मुद्गल पुराणातील गणपतीची विविध रूपे

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या हस्ते पूजा आणि आरती

240
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यातील श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारली मुद्गल पुराणातील गणपतीची विविध रूपे
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यातील श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारली मुद्गल पुराणातील गणपतीची विविध रूपे

पुण्यातील मानाचा दुसरा गणपती अर्थात श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे यंदाचे १३१वे वर्ष. (Pune Ganeshotsav 2023) पारंपरिकता जपणे आणि लोकांमध्ये नव्या माहितीचा प्रसार करणे, या उद्देशाने मंडळातर्फे यावर्षी श्री मुद्गल पुराणातील संकल्पनेवर आधारित देखावा साकारण्यात आला. त्यानिमित्त श्रीगणेशाचे विविध अवतार आणि त्या अवतारातील वाहने या संदर्भातील देखावा साकारण्यात आला आहे.

या देखाव्याचे वैशिष्ट्य सांगताना श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य सौरभ धडफळे यांनी सांगितले की, श्री गणपतीचे श्री मुद्गल पुराणातील विविध अवतार आणि त्या अवतारातील ५ वेगवेगळी वाहने असे स्वरुप साकारण्यात आले आहे. या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीचे विविध अवतार आणि त्या अवतारातील वाहन दर दोन दिवसांनी बदलण्यात येते. आतापर्यंत श्रीमूषकग/शेषात्मज या रुपाचे वाहन शेष, श्री धू्म्रवण्र या रुपाचे वाहन अश्व, श्री वक्रतुंड या रुपाचे वाहन सिंह आतापर्यंत साकारले गेले. आज आणि उद्या मंडळातर्फे भाविकांना गजाननाचे मुद्गल पुराणानुसार, श्री क्लपाविनायक आणि या रुपाचे वाहन नंदी या रुपातील दर्शन होत आहे, तर २७ सप्टेंबरला श्री गणपतीच्या मयुरेश्वरातील रुपाचे दर्शन त्याच्या मोर या वाहनासह घेता येईल. ही अनोखी संकल्पना पु्ण्यातील मूर्तिकार आणि शिल्पकार विठ्ठल गिरे यांची आहे तसेच दररोज गणपतीला विविध पद्धतीने सोवळं नेसवण्यात येतं. मूर्तीवरील उपरणे आणि शाल खांद्यावर ठेवण्याची पद्धतही दररोज बदलली जाते. याकरिता श्री शंकर महाराज मठात सेवा करणारे अमेय खाडिलकर गुरुजी दररोज १० दिवस ही सेवा करतात तसेच दरवर्षी आम्ही गणपतीची पगडीही बदलतो. पेशवाई, पुणेरी, शिंदेशाही… अशी विविध पद्धतीच्या पगडी गणपतीच्या मूर्तीला घालण्यात येतात. यंदा फक्त वाहनच बदलत असल्यामुळे दररोज मुकूटच घालायचा असे आम्ही ठरवले.

(हेही वाचा – गौरी-गणपतीच्या ४३ हजार मूर्तींचे रात्री १२ पर्यंत विसर्जन)

श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात. यंदाही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दीडशे ते दोनशे लोकांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले. ढोलताशा पथकाची या शिबिराकरिता मदत होते. मंडळातर्फे शैक्षणिक मदत, दत्तक योजनाही राबण्यात येतात. महिला दिनही साजरा केला जातो. यावेळी दिवसभरातील मंडळांच्या सर्व कार्यक्रमांचे नियोजन महिलाच करतात, असेही ते म्हणाले.

यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या हस्ते श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाची पूजा आणि आरती करण्यात आली. यावेळी स्मारकाचे आणि तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाचे सदस्य सौरभ धडफळे आणि संतोष कारकर उपस्थित होते.

मंडळाकडून यंदाचा ग्रामदेवता पुरस्कार ‘पुणे महानगरपालिके’ला…
तांबडी जोगेश्वरी गणेशोत्सव मंडळाला १२५ वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून मंडळाकडून ‘ग्रामदेवता पुरस्कार’ देण्याची प्रथा सुरू करण्यात आली. जे लोकं समाज बदलाचं कार्य करतात. ज्यांच्यामुळे समाजात मोठे बदल होत आहेत किंवा जे प्रसिद्धीपासून दूर आहेत. ज्यांना समाजासमोर आणण्याची गरज आहे, या दृष्टीने हा पुरस्कार मंडळातर्फे देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार ‘पुणे महानगरपालिके’ला देण्याचे आम्ही ठरवले आहे, तसेच ढोल-ताशा पथक आणि सामाजिक कार्य करणारे गणेश मंडळ यांना दरवर्षी २ ‘सेवाव्रत पुरस्कार’ प्रदान करण्यात येतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.