गाझियाबादमधील हिंडन एअरबेस येथे ‘C-295 MW'(C- 295 Transport Aircraft) हे विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील झाले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदू शास्त्रानुसार विमानावर कुंकवाने स्वस्तिक काढून विमानाची पूजा केली.
c-295 हे वाहतूक विमान सैन्य आणि मालवाहतुकीसाठी तयार करण्यात आले आहे. हे विमान सर्व प्रकारच्या धावपट्टीवर उतरण्यास सक्षम असून विमानात ऑटो रिव्हर्स क्षमता १२ मीटर अरुंद धावपट्टीवर १८० अंशात वळण्यास सक्षम आहे.’ भारत ड्रोन शक्ती २०२३’ हा कार्यक्रम आजपासून सुरू झाला. गाझियाबाद येथील भारतीय हवाई दलाच्या हिंडन हवाई तळावर आज आणि उद्या असे दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
#WATCH | Defence Minister Rajnath Singh inside C-295 MW transport aircraft following the aircraft’s formal induction into Indian Air Force at Hindon Airbase in Ghaziabad pic.twitter.com/DjegIyUsxw
— ANI (@ANI) September 25, 2023
काही दिवसांपूर्वी एअरबस डिफेन्स अँण्ड स्पेस कंपनीने भारताला c-295 विमाने सुपूर्द केली होती. एकूण ५६ C-295 विमाने ‘मेक इन इंडिया’च्या आधारे भारतात तयार केली जातील, ही विमाने टाटा आणि एअर बस संयुक्तपणे तयार करत आहे.
भारत ड्रोन शक्ती २०२३…
भारत ड्रोन शक्ती २०२३ हा कार्यक्रम डीआरडीओ फेडरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय हवाई दलाने संयुक्तपणे आयोजित केला. यावेळी ५० पेक्षा जास्त ड्रोनचे थेट हवाई प्रात्यक्षिक होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील सहभागी झाले होते तसेच हवाई दल प्रमुख व्ही.आर. चौधरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
(हेही वाचा – G20 Conference : परिषदेच्या तयारीला वेग; नेत्र विमानाच्या माध्यमातून दिल्लीच्या हवाई क्षेत्रावर नजर )