कारले आपल्या आरोग्यासाठी फार चांगले असते. कारल्यास नॅचरल ब्लड प्यूरिफायरसुद्धा म्हटले जाते. आयुर्वेदातसुद्धा कारल्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. मात्र कारले कडू असल्याने बहुतेक लोक कारले खात नाहीत. मात्र कारले खाण्याचे प्रचंड फायदे आहेत . चला तर कारले आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहेत ते जाणून घेऊयात (Benefits of Bitter gourd)
१) रक्तशुद्धीचे काम करते कारलं
कारल्यास बेस्ट ब्लड प्यूरीफायर मानल्या जाते. यात व्हिटॅमि न सीचे प्रमाण जास्त असते. जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. यात अँटीऑक्सिडंट्स तत्व आढळून येतात जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
२) मधुमेहावर रामबाण उपाय
कारल्यात आढळणारे केरॅटिन एलिमेंट शरीरातील ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत करते. शिवाय कारल्यात पॉलीपेप्टाइडसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. जे इन्सुलिनप्रमाणे शरीरातील वाढलेली ब्लड शुगर कंट्रोल करण्याचे काम करते.
३) ब्लड प्रेशरसाठीही फायदेशीर
कारल्यात असणारे पोटॅशियम शरीरातील ब्लड प्रेशर कंट्रोल करते. एवढेच नाही तर कारले खाल्ल्याने न्यूरोट्रांसमिशनची प्रक्रिया सुधारण्यासही मदत होते. म्हणून कारले आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.(Benefits of Bitter gourd)
(हेही वाचा : ISRO : विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचे पुढे काय होणार? इस्रोने दिली माहिती )
Join Our WhatsApp Community