सप्टेंबर महिना संपत आला आहे. काही दिवसांतच ऑक्टोबर महिना सुरू होईल. या महिन्यात अनेक सण येणार असल्यामुळे बँकेची काही कामे असतील तर ती लवकरात लवकर उरकून घ्या…याचे कारण सविस्तर वाचा.
ऑक्टोबर महिन्यात बँका तब्बल १६ दिवस बंद (Bank Holidays) राहणार आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात एकूण ९ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, पुढील महिन्यात देशभरात बँकांना १६ दिवस सुट्ट्या असतील. त्यापैकी ऑक्टोबर महिन्यात ५ रविवार आणि २ शनिवार असे सात दिवस बँका बंद राहतील याशिवाय २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि २४ ऑक्टोबर रोजी विजयादशमी असल्यामुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
(हेही वाचा – Supreme Court : मराठी पाट्यांवरून सर्वोच्च न्यायालयाकडून व्यापारी संघटनेची कानउघाडणी)
ऑक्टोबर महिन्यातील सुट्टयांची यादी
– १ ऑक्टोबर – रविवार
– २ ऑक्टोबर – गांधी जयंती
– ८ ऑक्टोबर – रविवार
– १४ ऑक्टोबर – शनिवार
– १५ ऑक्टोबर – रविवार
– २२ ऑक्टोबर – रविवार
– २४ ऑक्टोबर – दसरा/विजयादशमी
– २८ ऑक्टोबर – चौथा शनिवार
– २९ ऑक्टोबर – रविवार
डिजिटल सेवांवर बँकांच्या सुट्ट्यांचा परिणाम नाही
बँका बंद असल्यास ग्राहक अनेक प्रकारची कामे डिजिटल पद्धतीने पूर्ण करू शकतात. UPI, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवांवर बँकांच्या सुट्ट्यांचा कोणताही परिणाम होत नाही. त्यामुळे ग्राहक त्यांचे काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करू शकतात.