Pankaja Munde : वैद्यनाथ साखर कारखाना GST नोटीस प्रकरण, पंकजा मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

205
Pankaja Munde : वैद्यनाथ साखर कारखाना GST नोटीस प्रकरण, पंकजा मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या परळी येथील सहकारी कारखान्यावर सतत कारवाई होत आहे. दरम्यान केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर मोठी कारवाई करत तब्बल १९ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या सर्व प्रकारावर आता पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलतांना त्यांनी “कुठेही काहीही चुकीचं झालं नाही” असं सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मदत मिळाली असती, तर हे प्रकार घडले नसते…

प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या की; “जे आकडे सांगितले जातात, ते व्याजाबाबत आहेत. कुठेही काहीही चुकीचं झालं नाही. कारखाना तोट्यात असतानाही शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले आहेत. ऊस आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना चालला नाही. ८ ते ९ कारखान्यांनी दिल्लीत मदत मागितलेली, त्यात माझेही नाव होतं. पण, मी सोडून बाकीच्यांना आर्थिक मदत झाली. मदत मिळाली असती, तर हे प्रकार घडले नसते,” अशी खंत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केली.राज्यातील भाजपा नेते तुमची कोंडी करत आहेत? कितीदिवस ही कोंडी सहन करणार? या प्रश्नांवरती पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी सहनशील कन्या आहे. कितीदिवस सहन करायचं, हे ज्योतिषाला विचारून सांगते.”

(हेही वाचा – Supreme Court : मराठी पाट्यांवरून सर्वोच्च न्यायालयाकडून व्यापारी संघटनेची कानउघाडणी)

दरम्यान बच्चू कडू यांनीही या सर्व प्रकारावर भाष्य केलं आहे. “पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असं मला वाटतं” असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.