लातूर जिल्ह्यतील निलंगा येथील एका मिलला (Arpana Flour Mills Fire) मध्यरात्री भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र कोट्यवधींचा माल जळून खाक झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मिलचे आर्थिक नुकसान झाले आहे.
अधिक माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील अपर्णा फ्लोअर मिलला (Arpana Flour Mills Fire) मंगळवार २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मशीनरीसह कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलमधील मैदा आणि रव्याने भरलेल्या हजारो पोत्यांची जळून राख झाली आहे.
(हेही वाचा – Pankaja Munde : वैद्यनाथ साखर कारखाना GST नोटीस प्रकरण, पंकजा मुंडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…)
अपर्णा फ्लोअर मिल (Arpana Flour Mills Fire) ही पाच एकरवर पसरली असून यामध्ये अत्याधुनिक मशिनिंचा समावेश आहे. या मिलमध्ये दोन शिफ्टमध्ये काम चालत. आग लागली त्यावेळी देखील काही कामगार तिथे होते मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिलमधील गहू पीठ, मैदा, आणि रव्याच्या पोत्यांना आग लागल्याने ती आग पुढे झपाट्याने वाढली. त्यामुळे अग्निशमन दलाल ही आग विझवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community