Kolhapuri Chappals : कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय टॅग मिळाला, जाणून घ्या सविस्तर…

205
Kolhapuri Chappals : कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय टॅग मिळाला, जाणून घ्या सविस्तर...
Kolhapuri Chappals : कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय टॅग मिळाला, जाणून घ्या सविस्तर...

भारतात अनेक प्रकारच्या चामड्याच्या चपला तयार होत असल्या, तरी कोल्हापुरी चप्पलचा थाट निराळाच आहे. त्याचा सुबक आकार, नक्षीकाम, टिकाऊपणा यामुळे ही फक्त कोल्हापूर शहराच्याच नाही, तर भारत आणि भारताबाहेरील ग्राहकांच्या पसंतीस उतरते. पायाला बोचणाऱ्या काट्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी चामड्याच्या चपला आदिमानवाच्या काळापासून वापरल्या जाऊ लागल्या. सध्या या चप्पला फक्त कोल्हापुरात नाही, तर अनेक ठिकाणी तयार होतात. कोल्हापुरी चप्पलची क्रेझ आता जगभरात आहे. त्या लोकांना सहज उपलब्ध होतात, मात्र आता असे होणार नाही; कारण पेटंट, डिझाईन आणि ट्रेड मार्क्सच्या महासंचलकांनी कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी जीआय टॅग दिला आहे.

जीआय टॅग उत्पादनाचे भौगोलिक ठिकाण दर्शवण्यासाठी वापरले जाते. एखाद्या उत्पादनाला किंवा पदार्थाला जीआय टॅग मिळाल्यास दुसरे कोणीही त्याची नक्कल करू शकत नाही. महाराष्ट्र शासनाच्या वतीने इटलीमधील मिलान येथे १२४व्या एमआयपीईएल प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पल ठेवल्या आहेत. संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाच्या सुवर्णजयंती वर्षानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाने हे प्रदर्शन आयोजित केले होते. यामध्ये राज्याच्या वतीने प्रथमच चर्मोद्योगातील चर्मकार समाजाच्या नवउद्योजकांना या प्रदर्शनात सहभागी करण्यात आले.

(हेही वाचा – Asian Games 2023 : २६ सप्टेंबरचं भारतीय संघाचं पूर्ण वेळापत्रक जाणून घ्या)

यामध्ये मुंबईतील धारावी येथील कारागिरांनी तयार केलेला महिलांच्या बॅगांनाही चांगली मागणी मिळाली. महामंडळाच्या प्रयत्नांमुळे कोल्हापुरी चप्पलसाठी जीआय टॅग मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोल्हापुरी चप्पलची निर्यात मोठ्या प्रमाणात होण्यास चालना मिळेल.

निर्यात वाढली…
सध्या कोल्हापुरी चप्पल युरोप, मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये निर्यात केली जाते. वाहतुकीची सोय चांगली असल्याने देशभरात या चपला पाठवल्या जातात.

हेही पहा  – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.