BCCI Revenue : महिलांच्या आयपीएलमधून बीसीसीआयला ३७७ कोटींचा महसूल 

पुरुषांच्या आयपीएल लीगच्या धर्तीवर महिलांच्या डब्ल्यूपीएलचा प्रयोग यावर्षी पहिल्यांदा बीसीसीआयने केला. आणि या स्पर्धेतूनही क्रिकेट मंडळाने चक्क ३७७ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे

147
BCCI To Review New Zealand Series : न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवाचं बीसीसीआयकडून पोस्टमोर्टेम

ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात, बीसीसीआयने (BCCI Revenue) महिलांच्या वुमेन्स प्रिमिअर लीगमधून यंदा ३७७.४९ कोटी रुपयांचा महसूल गोळा केला आहे. पहिल्या वर्षी ४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान दोन ठिकाणांवर ही स्पर्धा घेण्यात आली होती.

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक सध्या गोव्यात सुरू आहे. त्यावेळी मंडळाचे खजिनदार आशिष शेलार यांनी आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा वार्षिक ताळेबंद सभासदांसमोर मांडला. यात डब्ल्यूपीएलचा हिशोबही मांडण्यात आला होता. पहिल्या वर्षी पाच महिला संघांमध्ये ही स्पर्धा पार पडली. पण, शेलार यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, बीसीसीआयला (BCCI Revenue) मिळालेल्या एकूण महसूलात डब्ल्यूपीएलचा वाटा ६ टक्के होता. तर पुरुषांच्या आयपीएलचा वाटा सर्वाधिक म्हणजे ३७ टक्के होता.

(हेही वाचा-PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 51,000 तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप)

भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे मीडिया हक्कं विकून बीसीसीआयने आपला ३८ टक्के महसूल (BCCI Revenue) कमावला आहे. तर पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यातूनही मंडळाला १० टक्के महसूल मिळाला आहे. आणि या सगळ्या महसूलाची बेरीज केली तर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये बीसीसीआयने एकूण ६,५५८.८० कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. गेल्यावर्षी हाच महसूल ४,३६०.५७ कोटी रुपये इतका होता. २०२१-२२ या हंगामात कोव्हिड १९ ने डोकं वर काढलं होतं. त्यामुळे फक्त ३ आंतरराष्ट्रीय स्पर्धा शक्य झाल्या. तसंच देशांतर्गत स्पर्धाही पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. पण, २०२२-२३ मध्ये आंतरराष्ट्रीय तसंच देशांतर्गत क्रिकेट कार्यक्रम आता नियमित झाला आहे.

‘बीसीसीआयचा खजिना माझ्याकडे आला तो सुदृध अवस्थेत. तो अधिक सक्षम करतानाच भारतीय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंना अधिकाधिक फायदा करून देण्याचा आपला दृष्टिकोण आहे. त्यातच आर्थिक कारभार स्वच्छ आणि पारदर्शी असावा यावर आपला भर असेल,’ असं आशिष शेलार यांनी बीसीसीआयच्या सदस्य असलेल्या राज्य संघटनांना आपला अहवाल सादर करताना सांगितलं.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.