गुलाबी थंडी आणि दिवाळीच्या सुट्टीनिमित्त पर्यटनाला विमानाने जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सणासुदीच्या काळात विमानाचे तिकीट दर वाढतात. यामुळे आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून विमान तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना दोन हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात येणार असून सेवाशुल्कही माफ करण्यात आले आहे.
आयआरसीटीसीचा (इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम) (IRCTC Service Charges) २४ वा स्थापना दिवस आणि जागतिक पर्यटन दिनानिमित्त विमान तिकीट आरक्षित करणाऱ्या प्रवाशांना दोन हजारांपर्यंत सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून २५ ते २७ सप्टेंबरदरम्यान तिकीटआरक्षित करणाऱ्या प्रवाशांना तिकिटावरील सेवाशुल्क माफ करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी नियोजित सुट्ट्या आणि नवीन वर्षासाठी तिकिटे आरक्षित करून प्रवाशांना सवलतीचा लाभ घेता येईल. फक्त १०० दिवसांपूर्वीचेच तिकीट आरक्षित करून सवलत मिळेल.
(हेही वाचा – Asian Games 2023 : २६ सप्टेंबरचं भारतीय संघाचं पूर्ण वेळापत्रक जाणून घ्या)
विविध बँकांच्या क्रेडिट-डेबिट कार्ड व्यवहारांवर २ हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे तसेच अधिकारी आणि कर्ममचाऱ्यांसाठीदेखील विशेष सवलत देण्यात येणार आहे. आयआरसीटीसीवरून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षणदेखील देण्यात येणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली आहे.
मोबाईल अॅपचा सर्वाधिक वापर…
रेल्वे प्रवाशांकडून तिकीट आरक्षणासाठी मोबाईल अॅपचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आयआरसीटीसीचे मोबाईल अॅप किंवा एअर तिकीट पोर्टल www.irctc.co.in यावरून विमान तिकीट आरक्षित केल्यास त्यावर सेवा शुल्क आकारण्यात येणार आहे.
एसटी महामंडळासोबत करार
देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या एसटी महामंडळाने तिकीट आरक्षणासाठी आयआरसीटीसीसोबत करार केला आहे. यामुळे येत्या महिनाभरात आयआरसीटीसीवरून एसटी गाड्यांचे आरक्षणदेखील शक्य होणार आहे.
हेही पहा –