दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या कॅनडाचा निषेध करण्यासाठी केसरी टूर्सने प्रथमच निषेधाचे पाऊल उचलले आहे. केसरी टूर्सने (Kesari Tours) कॅनडाच्या ६ सहली तातडीने रद्द केल्या आहेत. या सहलींसाठी ३०० पेक्षा जास्त पर्यटकांसाठीचे बुकिंग घेण्याची प्रक्रिया कंपनीने थांबवली आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच पुढाकार आहे.
कोरोना महामाराच्या आधी भारतातून कॅनडा पर्यटन जोमाने सुरू होते. कोरोना काळात हे पर्यटन थांबले. त्यानंतर आता हे पर्यटन थेट पुढच्या वर्षी मे ते सप्टेंबरदरम्यान होणार होते. याकरिता बुकिंग आणि व्हिसा प्रक्रिया सुरू होणार होती, पण केसरी टूर्सने कॅनडाचा निषेध करण्यासाठी ही प्रक्रिया तातडीने थांबवली आहे.
(हेही वाचा – Bus Accident : छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी)
‘दहशतवाद ही जगाची समस्या आहे. दहशतवाद्यांना कॅनडा पाठीशी घालत आहे. आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्या कृतीचा निषेध केला. त्यानंतर एका राष्ट्रभावनेतून आणि देशप्रेमातून केसरी टूर्सने कॅनडाविरुद्ध पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटानंतर कॅनडाच्या पर्यटनासाठी आमच्याकडे अनेकांनी विचारणा केली. आम्ही त्यासाठी सज्ज होतो, पण कॅनडाच्या पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह असल्याने आम्ही हा वाद मिटेपर्यंत सर्व सहली थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.’, अशी माहिती कंपनीच्या संचालक झेलम चौबळ यांनी दिली आहे.
कॅनडातील पर्यटनाचा काळ मेअखेर ते सप्टेंबरअखेर असतो. कोरोनानंतर तो २०२४मध्ये सुरू होणार होता. अशा प्रकारे सहली थांबवण्याचा आणि त्या रद्द करण्याचा विचार देशातील अनेक पर्यटक व्यवस्थापक करत आहेत, यासाठी केसरीकडून प्रथम पुढाकार घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community