Luggage Rules : विमान प्रवास करताय, या वस्तू सोबत घेऊन जाणे टाळा!

546
Air Travel चा घ्‍या आनंद, स्‍मार्टपणे भरा देय; व्हिसा सांगत आहे फ्लाइट्सवर सर्वोत्तम डिल्‍सचा आनंद घेण्‍यासाठी स्मार्ट टिप्‍स
विमानातून प्रवास करताना प्रवाशांच्या बॅगेत लोणचे, तूप, कापूर, सुके खोबरे, पार्टी पॉपर्स इत्यादी वस्तू हमखास सापडतात, यापुढे या वस्तूसोबत विमान प्रवास टाळा (Luggage Rules) कारण विमानतळ प्राधिकरणाने या वस्तूवर प्रतिबंध आणला आहे. नुकतेच एका विमान प्रवाशाच्या बॅगेतून मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणात सुक्या खोबऱ्याच्या वाट्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा पथके विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा तपासून त्यात असलेल्या प्रतिबंधित वस्तू जप्त करीत आहे.
या प्रतिबंधित वस्तूंमध्ये सुके खोबरे (कोपरा), फटाके, फ्लेअर्स, पार्टी पॉपर्स, माचेस, पेंट, फायर कापूर, तूप, लोणचे
आणि इतर तेलकट खाद्यपदार्थचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात परदेशात जाणारे अथवा इतर राज्यात विमानातून प्रवास करणारे प्रवाशी या वस्तू हमखास सोबत घेऊन जात असतात या वस्तूवर प्रतिबंध आणण्यात आले असल्याची माहिती विमान प्राधिकरण विभागातील सूत्रांनी दिली आहे.(हेही वाचा-Madhya Pradesh Assembly Elections : मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक: भाजपकडून केंद्रीय मंत्री आणि खासदार मैदानात)
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका सुरक्षा अधिकाऱ्यांनी एक धक्कादायक खुलासा करताना, मे महिन्यात मोठ्या प्रमाणात सुखे खोबरे (नारळ) जप्त केल्याचा अहवाल दिला आहे, एकट्या प्रवाशांच्या  बॅगमधून ९४३ सुक्या खोबऱ्याच्या वाट्या जप्त करण्यात आल्या होत्या अशी माहिती सुरक्षा अधिकारी यांनी आपल्या अहवालात दिली आहे. सुक्या नारळात मोठ्या प्रमाणात अत्यंत ज्वलनशील तेल असते, त्यामुळे विमानात उष्णतेच्या संपर्कात आल्यास आगीचा धोका संभवण्याची शक्यता असल्यामुळे या वस्तूवर विमानात प्रतिबंध आणण्यात आले आहे. ग  ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी ने मागील वर्षाच्या मार्चमध्ये निषिद्ध वस्तूंच्या यादीत सुक्या नारळाचा समावेश केला होता, तरीही अनेक प्रवाशांना या समावेशाबाबत माहिती नाही.(Luggage Rules)

एका अधिकार्‍याने म्हटले आहे की, बॅग तपासणीच्या वेळी  बॅगेजमध्ये वारंवार आढळणार्‍या काही प्रतिबंधित वस्तूंमध्ये (Luggage Rules) सुके खोबरे,  फटाके, फ्लेअर्स, पार्टी पॉपर्स, मॅचेस, पेंट, फायर कापूर, तूप, लोणचे आणि इतर तेलकट खाद्यपदार्थांचा समावेश असतो, त्याच बरोबर ई-सिगारेट, लायटर, पॉवर बँक, स्प्रे बाटल्या या प्रकारच्या वस्तू तपासणीमध्ये आढळून येतात.या सर्व वस्तू चुकीच्या पद्धतीने किंवा अयोग्यरित्या बॅगेत  ठेवल्यास उड्डाण सुरक्षेसाठी संभाव्य धोके निर्माण करू शकतात त्यामुळे या वस्तू विमान प्रवासात टाळाव्यात असे सुरक्षा अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=LhRZ0hUFRNs

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.