BJP : भाजपला बाप्पा पावणार का?

118

गणपती ही सुखकर्ता आणि विघ्नहर्ता देवता आहे. गणरायाच्या आगमानानं विघ्न दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. तशीच काहीशी भावना राजकीय नेत्यांची असतेच परंतु या उत्सवाचा राजकीय फायदा उचलण्यात कोणताच राजकीय पक्ष मागे नसतो. गणेशोत्सवात भेटीगाठी जनसंपर्क करीत राजकीय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या घरी भेटीगाठी घेण्यात येतात. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पाठोपाठ आता भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा देखील मुंबई आणि पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या गणेश दर्शन दौऱ्याचा त्यांना राजकीय फायदा होणार का?

गणेशोत्सवाच्या माध्यमातून निवडणुकीची राजनिती

उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे असे एकमेव राज्य आहे जेथे सर्वात जास्त लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीकडे पाहता महाराष्ट्र हे फार अत्यंत महत्त्वाचे असे राज्य आहे. भाजपच्या वतीने केंद्रीय नेतृत्वाची खास नजर महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांकडे आहे. त्यातच महाराष्ट्रात गणेशोत्सवासारखा मोठा सण असल्याने याचा जनसंपर्क आणि भेटीसाठी फायदा करून घेऊन येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्याचा प्रयत्न देखील भाजपकडून केला जात आहे. या आढाव्याचा सविस्तर तपशील घेऊन तो भाजपच्या (BJP) निवडणूक समितीसमोर मांडला जाणार आहे. त्यातच भेटीगाठीमुळे कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात बूस्ट करण्याचे काम नेत्यांकडून केले जाते. याचा खरंच फायदा भाजपला होणार का? बाप्पा भाजपला पावणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे लोकसभा निवडणुकीचे निकालच देऊ शकतात.

(हेही वाचा Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव नामांतराचा वाद पुन्हा एकदा न्यायालयात गाजणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.