Mumbai Water : मुंबईला पाणी पुरवठा करणारी सर्व धरणे काठोकाठ, पाणी साठा मागील दोन वर्षांच्याही पुढे…

191
Water Supply : जुलैच्या सुरुवातीला निम्म्यावर आलेला जलसाठा आता मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वांधिक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये पाण्याची पातळी आता पूर्ण क्षमतेने जमा झाली असून मागील काही दिवसांमध्ये सर्वांत कमी साठा असणाऱ्या हा पाणी साठा यंदा मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक जमा झाला आहे. मागील दोन वर्षात २६ सप्टेंबर पर्यंत जमा झालेल्या पाणी साठ्याच्या तुलनेत यंदा जास्त जमा झाला असून ही सर्व धरणे आणि तलाव आता काठोकाठ भरली आहेत. मागील वर्षातील पाणी साठ्याला वर्ष अखेरीस का होईना गाठत मुंबईकरांची वर्षभराची तहान भागविण्याचे लक्ष्य दृष्टिक्षेपात आणले.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता हळूहळू वाढ होत असून यासर्व धरणांमध्ये पाण्याच्या साठा २६ सप्टेंबर २०२३ रोजी तब्बल सुमारे ९९.२७ टक्के एवढा जमा झाला आहे. याच तारखेला सन २०२२ आणि २०२१ रोजी अनुक्रमे ९८.६८ टक्के व ९९.०९ टक्के एवढा होता. मागील २५ तारखेपर्यंत यावर्षीच्या पाणीसाठा यावर्षीच्या पाणीसाठा मागील दोन वर्षाच्या तुलनेत कमी होता. मात्र, २६ सप्टेंबरला हा पाणीसाठा मागील दोन वर्षाच्या तुलनेत अधिक झालेल्या दिसून आले देऊन महिना पूर्णपणे मोठ्या प्रमाणात या सर्व धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली त्यानंतर ऑगस्ट महिन्यात किंवा होत जाईल पण सप्टेंबर महिन्यात पुन्हा पाणीसाठ्यात कोणतेही वाढ होऊ न शकल्याने वर्षाभराचं नियोजन करण्यासाठी पाणी कपात लागू करण्याचा निर्धार महापालिका जला अभियंता विभागाने केला होता.

एक सप्टेंबर पर्यंत पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने पंधरा सप्टेंबर पर्यंत आढावा घेऊन पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार होता मात्र आजचा पाणीसाठा मुबलक तयार झाला असून पण तिचा पावसाळा सुरुवात होत असतानाच केवळ शून्य पूर्णांक ७५ टक्के एवढाच पाणीसाठा कमी असून हाही पाणीसाठा पुढे काही दिवसांमध्ये जमा होईल. आणि मुंबईकरांची वर्षभराची तहान भागेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असेल, असे जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

(हेही वाचा – Dream 11 Company : ‘ड्रीम इलेव्हन’ कंपनीला आयकर विभागाची नोटीस)

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्यवैतरणा, भातसा, विहार, आणि तुळशी या सात तलावांमधून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर्स एवढा पाण्याचा पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी यासर्व धरण तथा तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर्स एवढ्या पाण्याची आवश्यकता असते. अप्पर वैतरणा धरणातील एकूण पाणी साठा ९९.६८ टक्के तर भातसा धरणातील पाणी साठा ९९. २७ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. त्यामुळे आधीच सर्व धरणे भरून वाहत असताना भातसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा धरणे ही काठोकाठ भरल्याने मुंबईचे टेन्शन कमी झाले आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत किती पाऊस पडून पाणी साठा वाढतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

२६ सप्टेंबर २०२३ पर्यंतचा एकूण पाणी साठा

२०२३ : १४ लाख ३४ हजार ७८८ दशलक्ष लिटर्स (९९.२७ टक्के)

२०२२ : १४ लाख २८ हजार ३५३ दशलक्ष लिटर्स (९८.६८ टक्के)

२०२१ : १४ लाख ३४ हजार १३० दशलक्ष लिटर्स (९९. ०९ टक्के)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.