चीनच्या हांगझू या शहरात यावर्षीची म्हणजेच १९ वी आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games 2023) आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसच्या पुरुष संघाने विजयाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर आता भारताने या स्पर्धेतील तिसरे सुवर्ण पदक जिंकून पदकांच्या यादीत भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
भारताच्या (Asian Games 2023) नेमबाजांनी १० मीटर एअर रायफल गटात सुवर्ण; तसेच महिला क्रिकेट संघाने सुवर्ण पदक जिंकले. त्यानंतर आता घोडेस्वारांनी देशासाठी तिसरं सुवर्णपदक जिंकलं आहे. मागील ४० वर्षांत भारताने प्रथमच घोडेस्वारी या खेळात सुवर्ण कामगिरी केली आहे. अनुष अगरवाल, सुदीप्ती हजेला, हृदय विपुल छेडा आणि दिव्याकृती सिंह या चौघांनी मिळून ही सुवर्ण (Asian Games 2023) कामगिरी केली आहे.
🐎 𝗛𝗜𝗦𝗧𝗢𝗥𝗬 𝗖𝗥𝗘𝗔𝗧𝗘𝗗! The Dressage team etch their names in the history book as they become India’s first gold-medalists
since 1982 in Equestrian.👏 Congratulations are in order to Sudipti Hajela, Divyakriti Singh, Hriday Vipul Chheda, and Anush Agarwalla.
➡️… pic.twitter.com/CKFjrk1swp
— Team India at the Asian Games 🇮🇳 (@sportwalkmedia) September 26, 2023
(हेही वाचा – Dream 11 Company : ‘ड्रीम इलेव्हन’ कंपनीला आयकर विभागाची नोटीस)
पदकांच्या यादीत भारत पहिल्या पाच देशांमध्ये
तीन सुवर्ण पदकं जिंकून (Asian Games 2023) भारत पदकांच्या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. ६९ पदकांसह चीन पहिल्या स्थानावर, ३३ पदकांसह दक्षिण कोरिया दुसऱ्या स्थानावर, ३१ पदकांसह जपान तिसऱ्या तर उझबेकिस्तान १४ पदकांसह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आशियाई खेळामध्ये (Asian Games 2023) अजून अनेक स्पर्धा रंगणार असून भारताला अधिकाधिक पदक जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे भविष्यात पदकांच्या यादीत भारत पुढे जाईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community