मागील सात दिवसांपासून सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिक मधील कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद ठेवले आहेत. कांद्याचे व्यवहार बंद असल्याने राज्यात कांद्याचा तुटवडा होऊन भाव वाढीला सामोरे जावे लागणार आहे. कांदा प्रश्नावर सरकारच्यावतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, अद्याप तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, या मुद्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला. सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
(हेही वाचा – Manipur : मणिपूर प्रशासन चालवण्याचा हेतू नाही; का संतापले सर्वोच्च न्यायालय)
पवार म्हणाले, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लावले. हे शुल्क खूप जास्त आहे. वास्तविक कांदा निर्यातीवर शुल्क लावण्याची काहीही आवश्यकता नाही. हा निर्णय शेतकऱ्यांचे नुकसान करणारा आहे. कांद्यावरील निर्यातशुल्क मागे घेण्याचा निर्णय आजच घ्यावा, मंगळवारी (२६ सप्टेंबर) संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत राज्य सरकारची बैठक होणार असल्याने त्यात ठोस निर्णय घ्यावा. अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community